Red Card in Cricket: क्रिकेटपटूंनो टाईमपास कराल, तर खबरदार! आता फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटमध्येही 'रेड कार्ड'

क्रिकेटमध्येही आता फुटबॉलप्रमाणे रेड कार्डचा वापर करण्यात येणार आहे.
Cricket Red Card
Cricket Red CardDainik Gomantak
Published on
Updated on

Red Card in Cricket: क्रिकेटला जवळपास दीडशे वर्षांचा इतिहास आहे. या दीडशे वर्षात क्रिकेटमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडत गेले आहेत. अनेक नियम बदलले. अनेक क्रिकेट प्रकार आले. पांढऱ्या कपड्यांमधून रंगीत कपड्यांमध्येही क्रिकेट खेळले जाऊ लागले. सध्याचं क्रिकेटही आता वेगवान झाल्याचे म्हटले जाते.

मात्र, असे असले तरी बाकी खेळाच्या तुलनेत क्रिकेटच्या एका टी२० सामन्यालाही संपण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यातच अनेकदा डाव पूर्ण करण्यासाठीही संघ वेळ घेतात. त्यामुळे षटकांची गती कमी राखल्याबद्दल शिक्षाही आता सुनावली जाते. पण तरीही क्रिकेटमध्ये अनेकदा अशा घटना घडलेल्या पाहायला मिळतात.

Cricket Red Card
New Cricket Rule: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण बदल, 01 ऑक्टोंबरपासून होणार नवे नियम लागू

त्याचमुळे आता कॅरेबियन प्रीमियर लीगच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही स्पर्धांसाठी एक अनोखा नियम करण्यात आला आहे, जेणेकरून सामना वेळेत संपू शकेल. संघांना आता निर्धारित षटके पूर्ण करण्यासाठी उशीर झाल्यास रेड कार्ड दाखवून एका खेळाडूला बाहेर करण्यात येणार आहे.

दरम्यान, कॅरेबियन प्रीमियर लीगच्या नव्या नियमानुसार टीव्ही अंपायर मैदानातील अंपायरच्या द्वारे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्यांच्या षटकांच्या गतीबद्दल अपडेट देत राहाणार आहेत.

तसेच क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार संघांना १७ वे षटक ७२ मिनिट आणि १५ सेकंदाच्या आत संपवावी लागेल. जर तसे झाले नाही, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाचवा खेळाडूही ३० यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल.

Cricket Red Card
T20 Cricket New Rule: ICC ने T20 क्रिकेट मध्ये लागू केला नवा नियम

तसेच जर १८ व्या षटक ७६ मिनिट आणि ३० सेकंदापर्यंत पूर्ण झाले नाही, तर संघाला सहावा क्षेत्ररक्षकही ३० यार्ड सर्कलच्या आत घ्यावा लागणार आहे. याशिवाय जर १९ वे षटक ८० मिनिट आणि ४५ सेकंदात पूर्ण झाले नाही.

२० व्या षटकात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एका क्षेत्ररक्षकाला गमवावे लागणार आहे, त्याबरोबरच सहावा क्षेत्ररक्षकही ३० यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. दरम्यान, २० व्या षटकात कोणत्या खेळाडूला बाहेर करायचे हा निर्णय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार ठरवेल.

कॅरेबियन प्रीमियर लीग पुरुषांच्या स्पर्धेला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तसेच महिलांच्या स्पर्धेला १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com