Virat Kohli second Century in IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होत आहे. या सामन्यात बेंगलोरचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. विराटचे हे आयपीएल 2023 मधील सलग दुसरे शतक आहे.
विराटने रविवारी 60 चेंडूत शतकी खेळी केली. त्याचे हे आयपीएल कारकिर्दीतील सातवे शतक ठरले आहे. त्यामुळे तो आयपीएल इतिहासात सात शतके करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने ख्रिस गेलच्या 6 आयपीएल शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
7 - विराट कोहली
6 - ख्रिस गेल
5 - जोस बटलर
4 - केएल राहुल, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर
विराटने आयपीएल 2023 मध्ये पहिले शतक 18 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध केले होते. त्याने त्या सामन्यात 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता त्याने गुजरातविरुद्धही शतकी खेळी केली आहे. विराटने आयपीएल 2023 मध्ये 600 धावांचा टप्पाही पार केला आहे.स
रविवारी होत असलेल्या सामन्यात विराटने 61 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी करताना 13 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने या सामन्यात सलामीला फाफ डू प्लेसिसबरोबर 67 धावांची खेळी केली होती. त्यांनंतर त्याची अनुज रावतबरोबरही सहाव्या विकेटसाठी 64 धावांची नाबाद भागीदारी झाली.
पण बेंगलोरकडून विराट व्यतिरिक्त कर्णधार फाफ डू प्लेसिस (28), मायकल ब्रेसवेलने (26) आणि अनुज रावत (23*) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्यामुळे बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 197 धावा केल्या.
गुजरातकडून नूर अहमदने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, यश दयाल आणि रशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.