ना पासपोर्ट, ना फोन! प्रशिक्षकाला थेट गावी जावं लागलं शोधायला; पाकिस्तानच्या 'रजाउल्लाह'ची फिल्मी एन्ट्री अन् पहिल्याच षटकात जो रूटला केलं बाद VIDEO

Razaullah Pakistan Debut: इंग्लंडविरुद्धच्या एजबेस्टन कसोटीत पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज रजाउल्लाहने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.
Razaullah Joe Root wicket on Test debut
Pakistan fast bowler Razaullah celebrates after dismissing Joe Root on Test debutDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

इंग्लंडविरुद्धच्या एजबेस्टन कसोटीत पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज रजाउल्लाहने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानच्या संघात अचानक झालेल्या मोठ्या बदलांनंतर त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळाली आणि त्याने अवघ्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला बाद करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रजाउल्लाहने आपल्या वेगानेही प्रभावित केले असून पदार्पणाच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

संघात निवड झाली, पण पासपोर्टच नव्हता?

रजाउल्लाहच्या निवडीशी संबंधित एक धक्कादायक किस्सा सध्या चर्चेत आहे. उपलब्ध सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या कसोटीनंतर पाकिस्तानच्या निवड समितीने त्याची निवड केली, त्यावेळी त्याच्याकडे पासपोर्टही नव्हता. एवढेच नव्हे तर त्याचा फोन बंद असल्याने निवडकर्त्यांना त्याच्याशी संपर्क साधता येत नव्हता. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी प्रशिक्षकाला त्याच्या गावाकडे पाठवावे लागल्याचा दावा करण्यात येत आहे.

Razaullah Joe Root wicket on Test debut
Goa Beach Shack: गोव्यातील शॅक व्यावसायिकांनो सावधान! विनापरवाना शॅक उभारल्यास तब्बल 20 लाखांचा दंड; साहित्य जप्त करण्याचीही तरतूद

तातडीने पासपोर्ट आणि इंग्लंडचा व्हिसा

वेळ अत्यंत कमी असल्याने रजाउल्लाह साठी तातडीने आवश्यक प्रवासाची कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. त्यानंतर इंग्लंडचा व्हिसा मिळवून तो थेट पाकिस्तानच्या कसोटी संघात दाखल झाला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत कसोटी सामना खेळण्याची कल्पनाही त्याने केली नसेल, अशी त्याची परिस्थिती होती. मात्र अचानक मिळालेल्या संधीचे त्याने मैदानावर सोने केले.

एजबेस्टनमध्ये इंग्लंडच्या डावात गोलंदाजी करताना रजाउल्लाहने आपल्या चौथ्याच चेंडूवर जो रूटला बोल्ड केले. त्याचा चेंडू सुमारे 144 किमी प्रतितास वेगाने आला आणि रूटला तो रोखता आला नाही. पदार्पणाच्या सामन्यातच इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाची विकेट मिळवणे ही रजाउल्लाहसाठी मोठी कामगिरी ठरली. त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपताना 2 विकेट्स घेतल्या होत्या.

Razaullah Joe Root wicket on Test debut
Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

संकटात पाकिस्तानला मिळाली आशेची किरण

पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 133 धावांवर संपल्यानंतर संघ अडचणीत होता. मात्र रजाउल्लाहच्या वेगवान आणि प्रभावी गोलंदाजीने पाकिस्तानला सामन्यात काहीसा दिलासा दिला. 21 वर्षीय या गोलंदाजाने पदार्पणात दाखवलेली गुणवत्ता पाहता त्याच्याकडून पाकिस्तानला भविष्यात मोठ्या अपेक्षा असतील. एजबेस्टन कसोटीपूर्वी जवळपास अनोळखी असलेला रजाउल्लाह आता आपल्या पहिल्याच सामन्यात जो रूटची विकेट घेऊन चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com