…जेव्हा गर्लफ्रेंड समोर येताच रवी शास्त्रींची झाली होती बोलती बंद

शास्त्रींच्या आयुष्यात असा प्रसंग आला जेव्हा ते घाबरले आणि 10 मिनिटे काहीच बोलू शकले नाही. ही घटना शास्त्रींसोबत (Ravi Shastri) त्यांची एक्स गर्लफ्रेंडसमोर येताच घडली होती.
Ravi Shastri
Ravi ShastriDainik Gomantak
Published on
Updated on

रवी शास्त्री गेल्या काही महिन्यांपर्यंत सतत चर्चेत असायचे. त्यावेळी ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर त्यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक पद सोडले. शास्त्री (Ravi Shastri) हे कोचिंगदरम्यान उघडपणे बोलण्यासाठी ओळखले जात होते. क्रिकेट असो वा प्रेमप्रकरण प्रत्येक गोष्टीवर ते मोकळेपणाने बोलतात. परंतु शास्त्रींच्या आयुष्यात असा प्रसंग आला जेव्हा ते घाबरले आणि 10 मिनिटे काहीच बोलू शकले नाही. ही घटना शास्त्रींसोबत त्यांची एक्स गर्लफ्रेंडसमोर येताच घडली होती. ती समोर येताच शास्त्री यांचे बोलणे थांबले होते. शास्त्रींच्या आयुष्यातील अशी रंजक गोष्ट, जी त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका खूप जुन्या मुलाखतीत शेअर केली होती. शास्त्रींची मस्त शैली या मुलाखतीत पाहायला मिळते, जी अजूनही अबाधित आहे. (Ravi Shastri Had Stopped Talking When His Girlfriend Came In Front)

पहिल्या भेटीत दिवे बंद

या मुलाखतीत, जेव्हा अँकरने शास्त्रींना अशा प्रेमळ क्षणाबद्दल विचारले असता ते पूर्णपणे घाबरले होते. तेव्हा शास्त्री म्हणाले, "होय, तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला पहिल्यांदा भेटलो होतो." त्यानंतर अँकरने विचारले कोणती गर्लफ्रेंड? शास्त्री म्हणाले, "अमृता आहे तिचे नाव." अँकरने कन्फर्म करण्यासाठी अमृता सिंग (Amrita Singh) का असं विचारलं? त्यावर शास्त्री म्हणाले, “हो, त्याच नावाची तुम्ही पाहिले असेल फोटोमध्ये. मुंबईतील (Mumbai) एका रेस्टॉरंटमध्ये मी तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा पहिल्या 10 मिनिटांत मी एक शब्दही बोललो नाही. मला माहित होतं की मी मुली समोर आल्या की मला लाज वाटते, परंतु एक दिवस असा येईल की मी 10 मिनिटेही बोलू शकणार नाही हे मला माहीत नव्हतं. ती 10 मिनिटे बोलत राहिली. त्यामुळे तो माझ्यासाठी सर्वात इम्बैरेसिंग मूमेंट क्षण होता."

Ravi Shastri
'तो' धोनी सारखा चपळ का सेम धोनीचं?

लवस्टोरीला पूर्णविराम

शास्त्री आणि चित्रपट अभिनेत्री अमृता सिंग यांची लव्हस्टोरी खूप दिवसांपासून चर्चेत होती. शास्त्री याविषयी खुलेपणाने बोलत असत परंतु नंतर अमृताने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी (Saif Ali Khan) लग्न केले. शास्त्री हे भारताचे सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास आले. क्रिकेटला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शास्त्रींनी कॉमेंट्रीच्या विश्वात आपली छाप सोडली. आणि इथे नवीन उंची गाठली. ते दोनदा भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये होते. प्रथम 2014 मध्ये, ते टीम इंडियाचे संचालक म्हणून राहिले, नंतर 2017 ते 2021 पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com