दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या चालू हंगामात संघाच्या विजयात योगदान देताना दिसत नाही आहे. वेगवान सुरुवातीनंतर मोठी खेळी खेळण्यासाठी तो सतत संघर्ष करतोय. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतला खास सल्ला दिला आहे. (Ravi Shastri gives valuable advice to Rishabh Pant)
माजी क्रिकेटपटू शास्त्री म्हणाले की, "ऋषभ पंतला टी-20 फॉरमॅटमध्ये 'आंद्रे रसेल मोड'मध्ये फलंदाजी करणे आवश्यक आहे. त्याला उत्तम खेळी करण्याची गरज आहे. जेणेकरून तो त्याच्या संघ दिल्ली कॅपिटल्ससाठी अधिक सामने जिंकू शकेल."
ऋषभ पंतने या मोसमात आतापर्यंत 11 सामन्यांमध्ये 152.71 च्या स्ट्राइक रेटने 281 धावा केल्या आहेत. पण चांगली सुरुवात करून संघाला विजयापर्यंत नेण्यात तो बहुतांश वेळा अपयशी ठरला आहे. शास्त्री म्हणाले, "जास्त विचार करू नका. गोलंदाज कोण आहे याने काही फरक पडत नाही."
रवी शास्त्री कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलबद्दल बोलताना म्हणाले, "रसेल खूप हुशार आहे. जर तो मूडमध्ये असेल तर तो धोकादायक आहे. त्याला रोखणे अवघड आहे. ऋषभ देखील असे करण्यास सक्षम आहे आणि मला आशा आहे की तो याचा विचार करेल आणि टी-20 मध्ये एक विशेष खेळी खेळेल."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.