रवी शास्त्रींनी दिला रवींद्र जडेजाला बहुमूल्य सल्ला

रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाचा कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सलामीच्या लढतीत 6 गडी राखून पराभव केला.
Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Dainik Gomantak
Published on
Updated on

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) नवा कर्णधार रवींद्र जडेजाची सुरुवात खराब झाली. आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे रवींद्र जडेजाने कर्णधार म्हणून पहिला सामना गमावला. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाचा कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सलामीच्या लढतीत 6 गडी राखून पराभव केला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत असलेले माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कर्णधार जडेजाला सल्ला दिला आहे.

Ravindra Jadeja
IPL मध्ये मयंतीसह शास्त्रींचे कमबॅक, नेटकरी म्हणाले गोव्याला चालले काय?

रवी शास्त्रींनी रवींद्र जडेजाला दिला सल्ला
समालोचक रवी शास्त्री यांनी रवींद्र जडेजाला सल्ला दिला की त्याने गोलंदाजीसाठी थोडे आधी यायला हवे आणि शिवम दुबेला लवकर षटके देऊ नयेत. ते म्हणाले, 'मला वाटते कर्णधार म्हणून रवींद्र जडेजा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा त्याला थोडे अधिक धाडस दाखवावे लागेल.' नवनियुक्त कर्णधार रवींद्र जडेजाच्या रणनीतीबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले, 'मला वाटतं शिवम दुबेच्या जागी रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) किंवा मिशेल सँटनर सारख्या अनुभवी गोलंदाजांनी गोलंदाजी करायला हवी होती. कारण जेव्हा तुम्ही फक्त 130 धावांचा बचाव करत असता, तेव्हा एक चूकही तुम्हाला महागात पडू शकते. एक ओव्हर तुमच्या हातून खेळ पूर्णपणे काढून घेऊ शकते.

Ravindra Jadeja
MI vs DC: किंग कोहलीचा विक्रम हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) कोलकाता नाईट रायडर्ससमोर 20 षटकांत 132 धावांचे लक्ष्य ठेवले. जे कोलकाताने 9 चेंडू बाकी असताना पूर्ण केले. चेन्नईसाठी ड्वेन ब्राव्होशिवाय दुसरा कोणताही गोलंदाने चांगली कामगिरी केली नाही. शिवम दुबेने एक ओव्हर टाकली आणि 11 धावा दिल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 4 षटकात 25 धावा दिल्या. मिचेल सँटनरने 4 षटकात 31 धावा देत यश मिळवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com