क्रिकेटसाठी वडिलांच्या विरोधात गेलेल्या 'या' खेळाडूला टीम इंडियात मिळाली संधी

क्रिकेटसाठी रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) आपले शिक्षण सोडले आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध खेळत राहिला. सर्वांनी नकार देऊनही त्याचा स्वतःवरील विश्वास काही कमी झाला नाही.
Ravi Bishnoi
Ravi BishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) वनडे आणि टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी संघाची घोषणा केली. निवड समितीने गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये चमकदार गोलंदाजी करणारा युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) टी-20 संघात संधी दिली आहे. रवीसाठी हे त्याच्या कष्टाचे आणि त्यागाचे फळ आहे. त्याने क्रिकेटसाठी आपले शिक्षण सोडले आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध खेळत राहिला. सर्वांनी नकार देऊनही त्याचा स्वतःवरील विश्वास काही कमी झाला नाही. (Ravi Bishnoi Has Got A Chance In Team India For The T20 Series Against West Indies)

दरम्यान, 2018 मध्ये रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) क्रिकेटसाठी वडिलांच्या विरोधात जावे लागले होते. त्यावेळी त्याच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार असल्या तरी तो राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) नेटमध्ये गोलंदाजी करत होता. मुलाने परत येऊन परीक्षा द्यावी अशी वडिलांची इच्छा होती, परंतु रवीने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच त्याच्या करिअरला कलाटणी मिळू लागली. रवीने आजपर्यंत बोर्डाची परीक्षा दिलेली नाही.

Ravi Bishnoi
ड्वेन ब्राव्होचा 'पुष्पा' खुमार: रैना अन् वॉर्नरनंतर ब्राव्होनं केला श्रीवल्लीवर डान्स

तसेच, अंडर-19 विश्वचषकापूर्वी (U-19 World Cup) रवीला अनेकदा रिजेक्शनला सामोरे जावे लागले होते. त्याला प्रथम 16 वर्षाखालील ट्रायल्समध्ये रिजेक्ट करण्यात आले, त्यानंतर 19 वर्षाखालील चाचण्यांमध्ये त्याला दोनदा नाकारण्यात आले, तरीही त्याने हार मानली नाही. राजस्थान रॉयल्ससाठी गोलंदाजी करताना, तो कोचिंग स्टाफमध्ये असलेल्या दिशांत याज्ञिकला प्रभावित करण्यात यशस्वी झाला.

शिवाय, रवीची अंडर-19 विश्वचषकासाठी निवड झाली होती, जिथे त्याने संपूर्ण स्पर्धेत 17 विकेट घेतल्या होत्या. जपान आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) तो सामनावीरही ठरला. येथून त्याच्यासाठी आयपीएलचा (IPL) रस्ता खुला झाला, किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्यासोबत जोडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com