पाकिस्तान सुपर लीगमध्ये राशिद खानचा संघ लाहोर कलंदरच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये इस्लामाबाद युनायटेडचा पराभव करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे. आता टीम फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान पीएसएलची फायनल खेळू शकतो, अशी बातमी चर्चेत आहे. (Rashid Khan Will Play In The PSL Final Before The Third ODI Against Bangladesh)
दरम्यान, पाकिस्तानच्या चॅनल जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, राशिद खान (Rashid Khan) मुल्तान सुलतान्सविरुद्ध पाकिस्तान सुपर लीगचा (Pakistan Super League) अंतिम सामना खेळण्यासाठी लाहोर कलंदर संघात सामील झाला होता. मात्र राष्ट्रीय बांधिलकीमुळे राशिद खानने टूर्नामेंट मध्येच सोडावी लागली होती.
तसेच, रशीद सध्या बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) व्हाइट बॉलच्या मालिकेत अफगाणिस्तानकडून खेळत आहे. 3 एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. परंतु यामध्ये दोन्ही अफगाण संघ पराभूत झाले आहेत. आता तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 28 मार्च म्हणजेच सोमवारी होणार आहे. परंतु त्याआधी रशीद पाकिस्तान सुपर लीगच्या फायनलमध्ये खेळताना दिसणार असल्याचे वृत्त आले आहे. पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना 27 मार्च म्हणजेच रविवारी होणार आहे.
राशिद खान खेळणार PSL फायनल - रिपोर्ट
रशीद खानने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डालाही याबाबत माहिती दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. सामन्यात उतरण्यापूर्वी पाकिस्तानात पोहोचल्यानंतर त्याने कोरोना चाचणी देखील करुन घेतली आहे. पाकिस्तान सुपर लीग मध्यंतरी सोडून पुन्हा परतणारा राशिद खान एकटा नाही. त्याच्याआधी अॅलेक्स हेल्स आणि पॉल स्टर्लिंग यांनीही सोडून परत लीग खेळण्यास आले आहेत.
अंतिम फेरीत मुलतान सुलतान्स विरुद्ध लाहोर कलंदर
रशीद खानचा संघ लाहोर कलंदरने दुसऱ्या एलिमिनेटरपूर्वी झालेल्या अंतिम सामन्यात इस्लामाबाद युनायटेडचा 6 धावांनी पराभव केला. आता अंतिम फेरीत त्यांचा मुकाबला मुलतान सुलतानशी होणार आहे, ज्यांनी गटात अव्वल स्थान पटकावले आहे.
शिवाय, राशिद खानने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 बळी घेतले आहेत. त्याचवेळी, त्याआधी खेळल्या गेलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) T20 लीगमधील 9 सामन्यांमध्ये 13 बळी घेतले आहेत. जर रशीद खान पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम फेरीसाठी लाहोर कलंदर संघात सामील झाला तर शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील या संघाची ताकद वाढणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.