Fastest Fifty: धोनीच्या रांचीत रेल्वेच्या आशुतोषचा जलवा! युवराजच्या वेगवान फिफ्टीचा मोडला विक्रम

SMAT 2023: रेल्वेच्या आशुतोष शर्माने युवराज सिंगचा 12 चेंडूतील अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मागे टाकला आहे.
Ashutosh Sharma | Yuvraj Singh
Ashutosh Sharma | Yuvraj SinghInstagram
Published on
Updated on

Railways' Ashutosh Sharma breaks Yuvraj Singh record of fastest T20 fifty by Indian:

भारतात वनडे वर्ल्डकपची धामधूम असली, तरी सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी ही देशांतर्गत स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मंगळवारी रांचीमध्ये अरुणाचल प्रदेश आणि रेल्वे संघात सामना पार पडला. या सामन्यात रेल्वेकडून खेळणाऱ्या आशुतोष शर्माने मोठा कारनामा केला.

आशुतोषने या सामन्यात 11 चेंडूत अर्धशतक केले. त्यामुळे त्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे. आशुतोष आता टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. युवराजने 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक केले होते.

Ashutosh Sharma | Yuvraj Singh
World Cup 2023: पुणे, वर्ल्डकप अन् मोठा उलटफेर! कहाणी 27 वर्षांपूर्वीच्या सामन्याची

दरम्यान, मंगळवारी रांचीत पार पडलेल्या सामन्यात रेल्वे प्रथम फलंदाजी करत होते. आशुतोष जेव्हा फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा त्यांच्या 15 षटकांत 4 बाद 131 धावा झाल्या होत्या. पण आशुतोषने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला.

त्याने आक्रमक खेळत 12 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तो 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. त्याने खेळलेल्या 12 चेंडूतील 8 चेंडूवर त्याने षटकार खेचले, तर 1 चेंडूवर चौकार मारला.

त्याचे कव्हर, लाँग-ऑफ, लाँग ऑन आणि लेग-साईड अशा क्षेत्रात षटकार खेचले. तसेच कव्हरच्या क्षेत्रात एकमेव चौकार ठोकला. त्याच्या या आक्रमणामुळे रेल्वेने अखेरच्या 5 षटकात तब्बल 115 धावा जोडल्या. त्यामुळे त्यांनी 20 षटकात 5 बाद 246 धावा उभारल्या.

त्यानंतर 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशचा संघ 18.1 षटकात 119 धावाच सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना रेल्वेने 127 धावांनी सहज जिंकला.

25 वर्षीय आशुतोषसाठी हा रेल्वेसाठी दुसराच टी20 सामना होता. यापूर्वी त्याने टी20 आणि लिस्ट ए क्रिकेट मध्यप्रदेशकडून खेळले होते.

Ashutosh Sharma | Yuvraj Singh
World Cup 2023: गणपती बाप्पा मोरया... ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल!

युवराजचा आंतरराष्ट्रीय विक्रमही मोडलाय

दरम्यान, एकूण टी20 क्रिकेटमध्ये आत्ता जरी आशुतोषने युवराजने विक्रम मोडला असला, तरी जागतिक स्तरावर यापूर्वीच युवराजचा विक्रम मोडला गेला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु असताना हा विक्रम मोडला गेला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेमधील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतील नेपाळ आणि मंगोलिया यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात दिपेंद्र सिंग ऐरेने 10 चेंडूत 8 षटकारांसह नाबाद 52 धावा केल्या. या खेळीवेळी दिपेंद्र सिंगने केवळ 9 चेंडूतच 50 धावांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com