टी-20 विश्वचषकात (World Cup 2021) टीम इंडियाच्या (Team India) खराब कामगिरीने भारतीय क्रिकेटप्रेमी चांगलेच दुखावले आहेत. भारतीय संघ आपले सुरुवातीचे दोन्ही सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून हरला असून आता उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता फारच कमी आहे. भारतीय संघाच्या या खराब कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंना ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. संघाच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) मुलीला ऑनलाइन धमक्या आल्या आहेत. काही लोकांकडून होत असलेल्या खिलाडूवृत्तीच्या विरोधातील अशा वर्तनामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उघडपणे विराट कोहलीच्या समर्थनात उतरले आहेत. त्यांनी ट्विट करुन विराटला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'प्रिय विराट, हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही, त्यांना माफ करा.'
टी-20 विश्वचषकात भारतीय संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नाही, हे खरे आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने टीम इंडियाला 10 गडी राखून हरवले, तर किवी संघाने त्याचा 8 गडी राखून पराभव केला. संघाने कोणताही संघर्ष न करता विरोधी संघांसमोर ज्या प्रकारे शरणागती पत्करली, त्याबद्दल क्रीडा चाहत्यांमध्ये नाराजी आहे. असे असूनही, ऑनलाइन खेळाडूंविरुद्ध काही लोक ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत ते कदापि योग्य नाही. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारताला अनेक विजय मिळवून देणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला धर्माच्या आधारे ट्रोल करण्यात आले. विराटसह इतर खेळाडूही या वादातून सुटू शकले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.