PV Sindhu: सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी पीव्ही सिंधू

Singapore Open Badminton 2022 Final: सिंगापूरच्या ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूनं दमदार प्रदर्शन करून दाखवल आहे.
PV Sindhu
PV SindhuDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) चीनच्या वांग झि यि (Wang Zhi Yi) हीचा 21-9, 11-21, 21-15 पराभव केला. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर 500 विजेतेपदाची विजेती ठरली आहे. पहिल्यांदाच पीव्ही सिंधूनं सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित पीव्ही सिंधूने (PV Sindhu) वांगविरुद्ध पहिला सेट एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसरा सेट जिंकून वांगनं पुनरागमन केले. पण अखेरच्या सेटमध्ये पीव्ही सिंधूने बाजी मारली. सिंगापूर ओपनचे सुपर 500 विजेतेपद पटकावून पीव्ही सिंधूने कॉमेनवेल्थ गेम्सपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पीव्ही सिंधूचे हे तिसरे पदक आहे. यावर्षी तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये प्रथम कांस्यपदक आपल्या नावे केले. त्यानंतर सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनचे विजेतेपदही पटकावलं होतं.

PV Sindhu
Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय तुकडी जाहीर, 215 खेळाडू जाणार बर्मिंगहॅमला

* उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी
सिंगापूर ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूनं जपानच्या सेईना कावाकामीविरुद्ध एकहाती विजय मिळवला. चायनीज तैपेईच्या अग्रमानांकित ताय झू यिंगनं दुसऱ्या फेरीत माघार घेतल्यानं कावाकामीला पुढं चाल देण्यात आली होती. सिंधूनं कावाकामीविरुद्धच्या याआधीच्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले. 2018 च्या ओपन स्पर्धेत सिंधूचा तिच्याशी अखेरचा सामना झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com