44th Chess Olympiad Torch Relay : ''आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही''

''बुद्धिबळ सोंगटी प्रमाणे प्रत्येक व्यक्तीत अद्वितीय शक्ती आणि क्षमता असते''
PM MOdi
PM MOdi Dainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदिरा गांधी स्टेडियमवर 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांमधील क्षमता आणि शक्तीबद्दल भाष्य केले. भारत प्रथमच या खेळाचे यजमानपद भूषवणार आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. (Prime Minister Narendra Modi inaugurates the 44th Chess Olympiad Torch Relay at Indira Gandhi Stadium )

या कार्यक्रमावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करणाऱ्या FIDE ने ही ऐतिहासिक मशाल प्रज्वलित करण्याचा मान भारताला दिला आहे. ही मशाल 40 दिवसांत देशातील 75 शहरांमध्ये जाणार आहे. या स्पर्धेत 188 देश सहभागी होत आहेत. अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले की, भारतातून अनेक शतकांपूर्वी या खेळाची मशाल चतुरंगाच्या रूपाने जगभर गेली आहे. आज पुन्हा बुद्धिबळाची पहिली ऑलिम्पियाड मशालही भारतातून बाहेर पडत आहे. याबरोबर भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, ही बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल देशातील 75 शहरांमध्येही जाणार आहे.

PM MOdi
IND vs SA: T20 मालिकेची उत्कंठा शिगेला पण सामन्यावर पावसाचे संकट

पीएम मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्तीच्या क्षमता आणि शक्ती योग्य प्रकारे वापरल्यास बुद्धिबळाच्या सोंगटीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही आयुष्याचा पट जिंकू शकते असे ते यावेळी म्हणाले. बुद्धिबळाच्या प्रत्येक सोंगटीची जशी स्वतःची खास ताकद असते, तशीच एक अद्वितीय क्षमता प्रत्येकात असते. असे ते म्हणाले.

PM MOdi
मालिकेदरम्यान स्टार प्लेयरच्या घरी रंगली टीम इंडियाची जोरदार पार्टी, पाहा फोटो

जर एखाद्या सोंगटीने योग्य हालचाल केली, त्याची शक्ती योग्य प्रकारे वापरली तर ती सर्वात शक्तिशाली बनते. चेसबोर्डची ही खासियत आपल्याला जीवनाचा एक मोठा संदेश देते. योग्य आधार आणि योग्य वातावरण मिळाल्यास, सर्वात कमकुवत व्यक्तीसाठीही कोणतेही ध्येय अशक्य नसते. असे ही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

देशातील तरुणांमध्ये धैर्य, समर्पण आणि ताकदीची कमतरता नाही

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. देशातील तरुणांमध्ये धैर्य, समर्पण आणि ताकदीची कमतरता नाही. पूर्वी आमच्या या तरुणांना योग्य व्यासपीठाची वाट पाहावी लागत होती. आज 'खेलो इंडिया' मोहिमेअंतर्गत देश स्वतः या प्रतिभांचा शोध घेत आहे आणि कोरतो आहे. आपल्याला अभिमान वाटतो की, एक खेळ आपली जन्मभूमी सोडून जगभर आपला ठसा उमटवणारा खेळ अनेक देशांसाठी आवडीचा बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com