'रडला अन् रात्रभर झोपलाच नाही'... प्रदीप सांगवानने सांगितला विराटचा किस्सा

एका विनोदामुळे विराट कोहली कसा रडायला लागला आणि रात्रभर झोपही लागली नाही हे प्रदीपने शेअर केले आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) अलीकडच्या काळात चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे. विराटने नोव्हेंबर 2019 पासून कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाहीये. त्याच्या बॅटने कठीण प्रसंगांना तोंड देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. कोहलीच्या दिल्ली संघाचा माजी सहकारी प्रदीप सांगवान याने एक जुना किस्सा शेअर केला आहे. एका विनोदामुळे विराट कोहली कसा रडायला लागला आणि रात्रभर झोपही लागली नाही हे प्रदीपने शेअर केले आहे. (Pradeep Sangwan has told an old story of Virat Kohli)

Virat Kohli
खेलो इंडिया गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्र अव्वल

माजी भारतीय कर्णधार गेल्या दशकातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकीच एक आहे. या धडाकेबाज फलंदाजाने 2008 मध्ये राष्ट्रीय संघासाठी पदार्पण केले आणि तीनही फॉरमॅटमध्ये 70 शतकांसह 23,000 हून अधिक रन्स केल्या. विराट कोहली, जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे, तर भारताच्या 2011 विश्वचषक आणि 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयांचा देखील तो एक भाग राहिला आहे.

गुजरात टायटन्सचा खेळाडू प्रदीप संगवानने (Pradeep Sangwan) विराट कोहलीशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. ही घडना तेव्हाची आहे जेव्हा कोहली आणि सांगवान हे दिल्ली अंडर-17 टीमचे सहकारी होते. त्याच्या प्रशिक्षकाने विराटसोबत विनोद करण्याची योजना आखली होती. 'आम्ही पंजाबमध्ये अंडर-17 सामन्यामध्ये खेळत होतो. कोहलीला 2-3 डावात मोठी धावसंख्या करता आल्या नाहीत. आमचे प्रशिक्षक तेव्हाचे अजित चौधरी विराटला 'चीकू' म्हणत होते.

प्रदीप सांगवान पुढे सांगितले की, 'विराट आमच्या संघाचा मुख्य खेळाडू होता आणि अजित सरांनी गंमतीने आम्हाला सुचवले की विराटला सांगूया की तो पुढच्या सामन्यात खेळणार नाहीये. आम्ही सर्वजण या खोडसाळपणामध्ये सहभागी झालो. अजित सरांनी टीम मीटिंगमध्ये विराटच्या नावाची घोषणाच केली नाही.

तो त्याच्या खोलीत गेला आणि रडायला लागला. त्याने सरांना फोन करून सांगितले की मी 200 आणि 250 धावा रन्स केल्या आहेत. खरे सांगायचे तर त्या मोसमात त्याने मोठी धावसंख्या केली होती पण हो शेवटच्या 2-3 डावात त्याला संघर्ष करावा लागला होता. तो इतका भावूक झाला की त्याने राजकुमार सरांना फोनही केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com