पाकिस्तान क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज यासिर शाह (Yasir Shah) सध्या एका अत्यंत लाजिरवाण्या कारणामुळे चर्चेत आहे. या खेळाडूविरुद्ध 14 वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार करणाऱ्या मित्राला मदत करण्यासाठी यासिरचे नाव पुढे आले आहे. याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडूनही एक वक्तव्यही आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ (Rameez Raja) राजा यांनी बुधवारी सांगितले की, फिरकीपटू यासिर शाहच्या (Yasir Shah) कृत्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे नाव बदनाम झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एका जोडप्याने इस्लामाबादमधील शालीमार पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये यासिर शाहचेही नाव आले. या जोडप्याने आरोप केला आहे की, यासीरने आपल्या 14 वर्षांच्या भाचीवर बलात्कार केल्याचे माहीत असतानाही त्याने आपल्या मित्राला मदत केली आणि तिचा व्हिडिओ बनवला.
रमीझ पुढे म्हणाले, “यासिर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याचे समजण्यास काहीच हरकत नाही. आणि आम्ही या खेळाडूंना प्रशिक्षण देतो. त्यांनी कोणाशी कसे व्यवहार करावे हे त्यांना समजले पाहिजे.'
एफआयआरमध्ये असे नोंदविण्यात आले की, जेव्हा पती-पत्नी यासिरकडे मदतीसाठी गेले तेव्हा त्याने त्यांच्यावर हसत, संपूर्ण घटनेची खिल्ली उडवली. त्यांना आणि त्यांच्या भाचीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तो आपल्या नावाचा वापर करुन त्यांना न्यायालयात खेचणार असल्याचे सांगितले. यासिर आणि त्याचा मित्र फरहान बेपत्ता असून याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.