IND vs PAK: "आम्ही आमच्यासाठी काहीच मागितलं नाही!" आयसीसीच्या दणक्यानंतर मोहसीन नक्वींचा कांगावा; महामुकाबल्यावर पाकड्यांचा पर्दाफाश

PCB Chief Mohsin Naqvi Statement: मोहसीन नक्वी यांनी भारतविरोधी बहिष्काराच्या भूमिकेवरुन माघार घेतल्यानंतर जे विधान केले, त्यावरुन आता क्रीडा विश्वात नव्या वादाला तोंड फुटले.
PCB Chief Mohsin Naqvi Statement
PCB Chief Mohsin NaqviDainik Gomantak
Published on
Updated on

PCB Chief Mohsin Naqvi Statement: आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावरुन सुरु असलेल्या वादात आता एक नवे वळण आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारतविरोधी बहिष्काराच्या भूमिकेवरुन माघार घेतल्यानंतर जे विधान केले, त्यावरुन आता क्रीडा विश्वात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

9 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळण्यास अखेर संमती दर्शवली, मात्र या निर्णयाच्या अधिकृत घोषणेच्या अवघ्या काही मिनिटे आधी नक्वी यांनी एक धक्कादायक दावा केला. पाकिस्तानने घेतलेली ही मवाळ भूमिका स्वतःच्या फायद्यासाठी नसून केवळ बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी होती, असे नक्वी यांनी म्हटले.

मोहसीन नक्वी यांनी सांगितले की, पाकिस्तानने आयसीसीसमोर स्वतःसाठी कोणतीही मागणी ठेवली नव्हती. बांगलादेशने भारतात जाऊन खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने बांगलादेशच्या हितासाठीच स्टँड घेतल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, मीडिया रिपोर्ट्समधील माहिती नक्वी यांच्या दाव्याच्या पूर्णपणे उलट आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने आयसीसीच्या बैठकीत भारताविरुद्धची द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरु करण्याची आणि भारत-पाक-बांगलादेश अशी त्रिकोणी मालिका खेळवण्याची मागणी लावून धरली होती. आयसीसीने मात्र या मागण्या फेटाळून लावल्या आणि हे विषय आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट केले. असे असतानाही नक्वी यांनी सार्वजनिकरित्या 'आम्ही काहीच मागितले नाही' असे सांगून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला.

PCB Chief Mohsin Naqvi Statement
IND vs PAK: "त्यांनी नकार दिलाय, आम्ही नाही''! पाकड्यांच्या बहिष्कार नाट्यावर सूर्याचा रुबाब; वर्ल्ड कपच्या वादावर भारताची भूमिका स्पष्ट

या सर्व घडामोडींदरम्यान मोहसीन नक्वी आणि एका पत्रकाराच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सामना खेळण्याबाबतचा निर्णय होण्यापूर्वी नक्वी अत्यंत आत्मविश्वासात दिसत आहेत. जेव्हा पत्रकाराने त्यांना विचारले की काही 'गुड न्यूज' आहे का, तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिले की आम्ही नेहमीच चांगली बातमी देतो. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, बांगलादेशने आता पाकिस्तानला खेळण्याचे आवाहन केले असून त्यांचा प्रश्न सुटल्याचे संकेत मिळत आहेत. आम्ही जे काही केले ते बांगलादेशसाठीच केले, स्वतःसाठी काहीही साध्य करण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, असे सांगून त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

PCB Chief Mohsin Naqvi Statement
IND vs PAK: "भारताविरुद्धचा सामना आम्ही खेळणार नाही!" हाय-होल्टेज मुकाबल्यावर पाक PM शाहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य; पीसीबीला बसणार कोटींचा फटका?

या राजकीय आणि प्रशासकीय नाट्यानंतर आता हे निश्चित झाले की, रविवारी 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने येतील. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर या दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट असेल. आशिया चषकातील त्या सामन्यांमध्ये मैदानावर खेळाडूंमध्ये मोठी तणावाची स्थिती पाहायला मिळाली होती. त्यामुळे कोलंबोमध्ये होणारा हा महामुकाबला पुन्हा एकदा मैदानावरील थरार आणि खेळाडूंच्या इर्षेमुळे ऐतिहासिक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com