Pro Kabaddi 8: प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगमध्ये रचला इतिहास

प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात 1200 रेड पॉइंट्स मिळवणारा प्रदीप पहिला खेळाडू ठरला आहे.
Pardeep Narwal made history in Pro Kabaddi League

Pardeep Narwal made history in Pro Kabaddi League

Dainik Gomantak

Published on
Updated on

प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) मंगळवारी 4 जानेवारी रोजी यूपी योद्धाचा स्टार खेळाडू प्रदीप नरवालने (Pardeep Narwal) इतिहास रचला आहे. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात 1200 रेड पॉइंट्स मिळवणारा प्रदीप पहिला खेळाडू ठरला आहे. मात्र, ऐतिहासिक कामगिरी करूनही यूपी योद्धाच्या संघाला विजय मिळवता आला नाही. त्याचा तामिळ थलायवाज संघाने 39-33 अशा फरकाने पराभव केला.

यूपी योद्धाने या हंगामासाठी अनुभवी रेडर प्रदीप नरवालचा 1.65 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समावेश केला होता. तो या लीगमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. नरवालच्या पगाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाकिस्तानचा क्रिकेट कर्णधार बाबर आझमच्या पेक्षाही जास्त त्याची सॅलरी आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणाऱ्या बाबरला 1.24 कोटी रुपये मिळतात. नरवालला त्यांच्यापेक्षा 41 लाख रुपये जास्त मिळतात.

<div class="paragraphs"><p>Pardeep Narwal made history in Pro Kabaddi League</p></div>
VIVO Pro Kabaddi: यूपी योद्धाच्या या 7 खेळाडूंना मिळू शकते संधी

नरवालला कबड्डीत ‘रेकॉर्ड ब्रेकर’ म्हणून ओळखले जाते. प्रदीपला डिप किंग या नावानेही ओळखले जाते. तो या लीगमधील सर्वात यशस्वी रेडर आहे. पटना पायरेट्ससोबत सलग तीन वेळा प्रो कबड्डी लीगचा किताब पटकावण्यात यशस्वी खेळाडू ठरला आहे. त्यामुळे तिसर्‍या मोसमापासून पाचवा हंगामापर्यंत पाटणाचा संघ सलग तीन वेळा चॅम्पियन ठरला.

नरवालची गेल्या मोसमातील कामगिरीही उत्कृष्ट होती. त्याला 304 गुण मिळाले होते. मात्र, संघाने त्याच्याशी करार सुरू ठेवला नाही. गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

<div class="paragraphs"><p>Pardeep Narwal made history in Pro Kabaddi League</p></div>
NZ vs BAN: न्युझीलंडच्या भूमीवर बांग्लादेशने तोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड

नरवालने सहा हंगामात 1200 गुण गाठले

सीझन तीन 116 रेड पॉइंट

चौथा हंगाम 131 रेड पॉइंट

पाचवा हंगाम 369 रेड पॉइंट

सहावा हंगाम 233 रेड पॉइंट

सातवा हंगाम 302 रेड पॉइंट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com