T20 WC 2022 Final: वर्ल्डकप जिंकण्यासाठी पाकिस्तानी खेळाडु पाळताहेत रोजा

1992 मध्ये फायलनमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याआधीही इम्रान खानच्या संघाने पाळला होता रोजा
T20 WC 2022 Final
T20 WC 2022 FinalDainik Gomantak

T20 WC 2022 Final Pak Vs Eng: टी-20 वर्ल्डकपमध्ये उद्या, रविवारी इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होत आहे. दरम्यान, वर्ल्डकप जिंकण्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत असून विविध हातखंडे वापरण्याच्या तयारीत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी संघातील खेळाडु सध्या रोजा पाळत आहेत. अल्लाहची प्रार्थना केल्याने त्यांना 1992 प्रमाणे विश्वचषक जिंकता येईल, अशी पाकिस्तानी खेळाडुंची श्रद्धा आहे.

T20 WC 2022 Final
Rahul Dravid: वर्षाला 10 कोटी मोबदला घेणाऱ्या राहुल द्रविडचे प्रशिक्षकपद धोक्यात?

सन 1992 च्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने सेमीफायलनमध्ये न्यूझीलंडचा तर फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून वर्ल्डकप जिंकला होता. विशेष म्हणजे, 1992 मध्येदेखील पाकिस्तानी संघाने तेव्हा रमजान महिना सुरू होता या कारणाने रोजा पाळला होता, आणि त्यांना वर्ल्डकपच्या रूपाने ईदी मिळाली होती. आता पाकिस्तान संघाला तो इतिहास पुन्हा घडेल असे वाटत आहे.

तशा घटनाही घडत आहेत. 1992 मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केले होते. आताही पाकिस्तानने सेमीफायलनमध्ये न्यूझीलंडलाच पराभूत केले आहे. आणि आताही फायलनमध्ये पाकिस्तानची लढत इंग्लंडशीच होत आहे.

T20 WC 2022 Final
Nose Grown On Hand: डॉक्टरांनी महिलेच्या हातावर उगवले नाक; फ्रान्समध्ये विचित्र शस्त्रक्रिया

त्यामुळे सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संपुर्ण पाकिस्तान संघासह त्यांचा सपोर्ट स्टाफदेखील दररोज रोजा पाळत आहे. सामन्याचा दिवस वगळता पाकिस्तानी संघातील तमाम खेळाडू रोजा पाळत आहेत. यावेळी ईद नसली तरी अल्लाह त्यांना आताही ईदी देईल, असा विश्वास पाकिस्तानी संघाला आहे. पाकिस्तानचे खेळाडू आणि नागरीक बऱ्याचदा सामान जिंकल्यानंतर अल्लाहचे आभार मानताना दिसतात. आता पाकिस्तानी संघ 1992 ची पुनरावृत्ती करणार का, याचीच उत्सुकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com