पाकिस्तानी क्रिकेटपटूने मदतीसाठी केला जय श्री रामाचा धावा !

पाकिस्तान क्रिकेट संघातील धडाकेबाज क्रिकेटर दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने पुन्हा एकदा पाकिस्तान बोर्डाकडे मदतीची याचना केली आहे.
Danish Kaneria

Danish Kaneria

Dainik Gomantak

पाकिस्तान क्रिकेट संघातील धडाकेबाज क्रिकेटर दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने पुन्हा एकदा पाकिस्तान बोर्डाकडे मदतीची याचना केली आहे. अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डात बदल करण्यात आले आहेत. माजी क्रिकेटपटू रमीझ रझा (Rameez Raza) यांना बोर्डाचे प्रमुख बनवण्यात आले असून त्यानंतर त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता कनेरियालाही त्यांच्याकडून आशा आहेत आणि त्यामुळेच त्याने सोशल मीडियावर (Social media) मदतीचे आवाहन केले आहे.

<div class="paragraphs"><p>Danish Kaneria</p></div>
आयसीसीने इंग्लंडला दिला मोठा धक्का, चौथ्या क्रमांकावर टीम इंडिया

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघासाठी पन्नासहून अधिक कसोटी सामने खेळलेल्या कनेरियाने सध्याच्या बोर्डाकडे मदतीचे आवाहन केले आहे. हिंदू असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. त्याचबरोबर निवड समिती पक्षपाती असल्याचा आरोप फिरकीपटूने केला आहे. सध्या त्याच्यावर क्रिकेट खेळण्यास बंदी आहे. ही बंदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) हटवण्याची मागणी कनेरिया करत आहे. ज्यांनी हे सर्व केले ते तुरुंगात गेले असून पाकिस्तानने (Pakistan) मदतीचा हात पुढे करावा, असे त्याचे म्हणणे आहे.

तसेच, सोशल मीडियावर आपले म्हणणे मांडताना कनेरिया मदतीसाठी विचारत आहे. त्याने लिहिले, जय श्री राम, माझ्याशी असे का वागले याचे उत्तर पाकिस्तान आणि पीसीबीकडे आहे का? ज्यांनी भ्रष्टाचार केला ते सर्व तुरुंगात गेले आहेत, या सर्वांना पाकिस्तान आणि पीसीबीकडून भरपूर पाठिंबा मिळाला होता परंतु आता ते क्रिकेट जगतात कुठेच नाहीत. पण माझ्यासाठी कोणी आवाज का उठवत नाही. पाकिस्तान आणि पीसीबी एक हिंदू म्हणून मला मदतीचा हात पुढे करेल आणि माझ्यावरील बंदी उठवेल का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com