Pakistan Cricketer Mohammad Hafeez: सध्या पाकिस्तान सुपर लीगचा 8वा सीझन भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये खेळला जात आहे.
या लीगदरम्यान पाकिस्तानच्या एका स्टार फलंदाजासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मंगळवारी या खेळाडूच्या घरात चोरी झाली आहे. हा खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा एक भाग आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज सध्या पाकिस्तान (Pakistan) सुपर लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, गेल्या मंगळवारी त्याच्या लाहोर येथील घरात चोरी झाली.
हाफिजच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कम, विदेशी चलन आणि मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या आहेत. अहवालानुसार, चोरट्यांनी $20,000, 5000 UAE दिरहाम, 4000 पाउंड आणि 3000 युरो चोरले आहेत.
मोहम्मद हाफीजच्या पत्नीच्या काकांनी पोलिसांत (Police) चोरीची तक्रार दाखल केली, त्यानंतर एसएचओ डिफेन्स पोलिस आणि फॉरेन्सिक सायन्स एजन्सीची टीम हाफीजच्या घरी चौकशीसाठी पोहोचली.
चोरीच्या वेळी त्याच्या घरी कोणीही नव्हते. त्याची पत्नी काही कामानिमित्त इस्लामाबादला गेली होती. याचा फायदा घेत चोरट्यांनी घेतला.
पाकिस्तानसाठी 55 कसोटी, 218 एकदिवसीय आणि 119 टी-20 सामने खेळणारा अष्टपैलू मोहम्मद हाफीजने 3 जानेवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मद हाफिजने 2018 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हाफिजने तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले.
त्याने 3 एप्रिल 2003 रोजी शारजाह येथे झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने पाकिस्तानसाठी तीन आयसीसी विश्वचषक आणि सहा टी-20 विश्वचषक खेळले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.