BCCI: भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीसाठी पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा अर्ज?

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांचेही अर्ज
BCCI
BCCIDainik Gomantak
Published on
Updated on

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठे बोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) ओळख आहे. बीसीसीआयच्या निवड समितीत संधी मिळावी यासाठी अनेक खेळाडू प्रयत्न करत असतात. दरम्यान, राष्ट्रीय निवड समितीसाठी उमेदवारांचा 'बायो डेटा' तपासण्यासाठी BCCI च्या अधिकाऱ्यांनी मेल बॉक्स उघडला तेव्हा अजब प्रकार उघडकीस आला.

BCCI
Vagator: वागातोर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, दोन गाळे जळून खाक; अडीच लाखाचे नुकसान

बीसीसीआयला पाच सदस्यीय निवड समितीसाठी 600 हून अधिक ई-मेल अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी काही तेंडुलकर, धोनी, सेहवाग आणि इंझमाम यांच्या नावाच्या 'बनावट आयडी'वरून बनवले गेले आहेत.

BCCI च्या अधिकाऱ्यांना 'मेल बॉक्स'मध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांचे अर्ज आल्याचे पाहून अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. एवढेच नव्हे तर, यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार इंझमाम उल हक (Inzamam ul Haq) याचा देखील अर्ज आला होता.

BCCI
Kopardem: धक्कादायक! कोपार्डे येथे शिकारी जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू

गमंत म्हणजे हा सगळा 'बायो डेटा' 'स्पॅम ईमेल आयडी' वापरून काही टवाळखोरांनी BCCI ला पाठवला असल्याचे दिसून आले. त्यामुळे या ईमेलकडे BCCI ने दुर्लेक्ष केले.

दरम्यान, BCCI क्रिकेट सल्लागार समिती या पदांसाठी 10 नावांची निवड करणार आहे. बीसीसीआयने गेल्या महिन्यात चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती भारत टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर बरखास्त केली होती. पण, नवीन समिती स्थापन होत नाही, तोपर्यंत हे पॅनल कार्यरत राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com