Pakistan Captain: बाबरने नेतृत्व सोडताच पाकिस्तानला मिळाले दोन नवे कॅप्टन! शाहिन आफ्रिदीकडे टी20 ची जबाबदारी

Shaheen Afridi: बाबर आझम कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर पाकिस्तानने दोन नव्या कर्णधारांची घोषणा केली आहे.
Pakistan Cricket
Pakistan CricketDainik Gomantak

Pakistan Cricket Board announced New Captains after Babar Azam leave Captaincy:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल घडले आहेत. या वर्ल्डकप स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यानंतर स्टार खेळाडू बाबर आझमने तिन्ही क्रिकेट प्रकारातील पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.

बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर पाकिस्तानने दोन नव्या कर्णधारांची घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शान मसूदकडे कसोटी कर्णधारपद आणि शाहिन शाह आफ्रिदीकडे टी२० संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. वनडे कर्णधारपदाचा निर्णय थोड्या दिवसांनी घेतला जाणार आहे.

Pakistan Cricket
Pakistan Cricket: बाबर आझमने सोडली कॅप्टन्सी! मायदेशी परतताच सोशल मीडियावर जाहीर केला मोठा निर्णय

34 वर्षीय शान मसूद त्याच्या कारकिर्दीत 30 कसोटी सामने खेळला असून 4 शतके आणि 7 अर्धशतकांसह त्याने 1597 धावा केल्याआहेत. तो आता 14 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसेल. त्याला 2023-25 कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा संपेपर्यंत ही जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्स संघाचे नेतृत्व सांभाळलेला वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीला पाकिस्तानच्या टी20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

23 वर्षीय शाहिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 52 सामन्यांमध्ये 64 विकेट्स घेतले आहेत. तो आता न्यूझीलंड दौऱ्यात जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानचे 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्यांदाच नेतृत्व करताना दिसेल.

Pakistan Cricket
Shaheen Afridi: शाहिनचा वेग ठरला विश्वविक्रमी! 100 ODI विकेट्स घेत रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

बाबरच्या डोक्यावरील कॅप्टन्सीचं ओझं कमी झालं - पीसीबी

पीसीबीच्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष झाका अश्रफ म्हणाले, 'बाबर आझम खरंच जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि आम्हाला त्याने खेळाडू म्हणून खेळत राहावे असे वाटते. पाकिस्तानला मिळालेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी तो एक आहे. तो आमच्यासाठीएक दागिना आहे आणि आम्ही यापुढेही त्याला पाठिंबा देत राहू. त्याचे फलंदाजीतील पराक्रम त्याची जिद्द आणि कौशल्य दाखवतात. सध्याच्या पिढीसाठी तो आदर्श आहे.'

त्यांनी पुढे म्हटले, 'आम्हाला त्याला महान फलंदाज बनताना पाहायच आहे आणि आता नेतृत्वाच्या ज्यादाच्या ओझ्याशिवाय तो त्याच्या कामगिरीवर अधिक लक्ष देऊ शकतो आणि आणखी मोठी शिखरे पार करू शकतो. आम्ही त्याच्या निर्णयाचा मान ठेवतो आणि त्याला यापुढेही पाठिंबा देत राहू.'

बाबर आझमने पाकिस्तान संघाचे नेतृत्व सोडताना तो खेळाडू म्हणून तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com