पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, इंझमाम उल हकने मुख्य सिलेक्टर्स पदाचा दिला राजीनामा!

Inzamam-ul-Haq: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम भारतात पाहायला मिळत असतानाच पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे.
Inzamam-ul-Haq
Inzamam-ul-HaqDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Chief Selector Inzamam Ul Haq Resigns: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम भारतात पाहायला मिळत असतानाच पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली. दरम्यान, खेळाडूंमधील भांडण आणि त्यांची दोन शिबिरांमध्ये विभागणी झाल्याच्या बातम्या आल्या, परंतु लगेचच पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुढे आले आणि त्यांनी असे वृत्त फेटाळून लावले आणि याला अटकळ असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी खेळाडू सातत्याने सध्याचा कर्णधार बाबर आझमवरही प्रश्न उपस्थित करत होते. विश्वचषकानंतर बाबर आझमकडून (Babar Azam) कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. हे सर्व सुरु असतानाच अचानक बातमी आली की, मुख्य सिलेक्टर्स आणि पाकिस्तानी संघाचे माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनी आपल्या मुख्य सिलेक्टर्स पदाचा राजीनामा दिला आहे.

इंझमाम उल हक यांनी सिलेक्टर्स पदाचा राजीनामा दिला

पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचे मुख्य सिलेक्टर्स इंझमाम उल हक यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, त्यांच्यावर हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप करण्यात आले होते. जिओ न्यूजनुसार, इंझमाम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, लोक रिसर्चशिवाय बोलतात. माझ्यावर प्रश्न उपस्थित केले गेले त्यामुळे मी राजीनामा दिला तर बरे होईल असे ठरवले.

निवेदनात पुढे म्हटले की, पाकिस्तानी खेळाडूंची मॅनेजमेंट कंपनी पीसीबीकडे नोंदणीकृत आहे, ज्यामध्ये इंझमाम उल हक देखील कथितरित्या पार्टनर आहेत. अनेक बडे खेळाडू या कंपनीशी निगडीत आहेत, जसे मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम यांचाही समावेश आहे.

मुख्य सिलेक्टर्स अशा कंपनीचे पार्टनर आहेत जी खेळाडूंना कॉन्ट्रक्ट देण्यात गुंतलेली आहे, असा आरोप हक यांच्यावर करण्यात आला होता.

दुसरीकडे, बाबार आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ एकदिवसीय विश्वचषकात सध्या खराब कामगिरी करत आहे. दरम्यान, पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांनी कर्णधार बाबर आझमचे बोर्डाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबतचे पर्सनल कॉलिंग लीक केल्यानंतर बोर्ड वादात सापडला होते. त्यानंतर इंझमाम उल हक यांची ऑगस्टमध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, पीसीबीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ निवड प्रक्रियेशी संबंधित हितसंबंधांच्या संघर्षाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

ही समिती आपला अहवाल तातडीने पीसीबी मॅनेजमेंटला सादर करेल. यानंतर, इंझमाम उल हक यांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, ते तपासासाठी पूर्णपणे तयार आहेत.

ते पुढे म्हणाले की, लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी पीसीबीला चौकशी करण्यास सांगितले आहे. माझा प्लेयर-एजेंट कंपनीशी कोणताही संबंध नाही. अशा आरोपांमुळे मला दु:ख झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com