Sitara-E-Pakistan: पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बाबर आझम सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर वनडे आणि टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर राहणारा तो सध्या जागतिक क्रिकेटमधील एकमेव क्रिकेटपटू आहे.
दरम्यान, 27 वर्षीय बाबर सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला आता 16 ऑगस्टपासून नेदरलँड्ससोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी बाबरला देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'सितारा-ए-पाकिस्तान' ने सन्मानित करण्यात आला.
दुसरीकडे,आगामी क्रिकेट हंगाम सुरु होण्यापूर्वी, बाबरला रविवारी क्रिकेटमधील (Cricket) उत्कृष्ट योगदानाबद्दल 'सितारा-ए-पाकिस्तान' पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबरशिवाय पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारुफ हिला 'तमगा-ए-पाकिस्तान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अंध क्रिकेटपटू मसूद जानला प्राईड ऑफ परफॉर्मन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
शिवाय, आपल्या खेळाडूंचे अभिनंदन करताना PCB ने सांगितले की, "मसूद जान (अंध क्रिकेटपटू), पाकिस्तानच्या पुरुष संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि पाकिस्तानच्या महिला संघाचा कर्णधार बिस्माह मारुफ यांना पाकिस्तानच्या (Pakistan) 75 व्या वर्धापनदिनानिमित्त नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.