Nahida Khan announced retirement: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाज नहिदा खानने 14 वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. नाहिदाने तिच्या कारकिर्दीत एकूण ७ वर्ल्डकप खेळले आहेत
नाहिदाने 7 फेब्रुवारी 2009 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विशेष म्हणजे नाहिदा ही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारी बलुचिस्तानची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.
नाहिदाने तिच्या कारकिर्दीत 2013, 2017 आणि 2022 वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. तसेच 2012, 2014, 2016 आणि 2018 टी20 वर्ल्डकपमध्ये सहभाग नोंदवला होता.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिच्या निवृत्तीबद्दल माहिती देताना लिहिले की 'नाहिदा खानने पाकिस्तानचे तीन वनडे आणि ४ टी२० वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व केले. तिचे पाकिस्तानसाठीच्या तिच्या १४ वर्षांच्या कालावधीसाठी अभिनंदन.'
नाहिदाने एकूण १२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना २०१४ धावा केल्या. यामध्ये तिच्या ८ अर्धशतकांचा समावेश आहे. यात तिने 2018 मध्ये क्वाललंपुर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या ६६ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. तिच्या नावावर एकाच वनडे डावात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही आहे. तिने डंबुला येथे २०१८ मध्येच श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानने विजय मिळवलेल्या सामन्यात ४ झेल घेतले होते.
नाहिदाने निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हटले की 'मला माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी माझ्या कुटुंबाचे, संघसहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि माझ्या क्षमतेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.'
'मी माझ्या चाहत्यांचेही आभार मानते, ज्यांनी मला पाकिस्तानमध्ये आणि जगभरात, माझ्या संपूर्ण प्रवासात पाठिंबा दिला.'
आता नाहिदा प्रशिक्षण क्षेत्रात उतरत आहे. तिने नुकतेच कराचीमध्ये आयोजित पाकिस्तान पक महिला क्रिकेट स्पर्धेत ब्लास्टर्सची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.