पाकिस्तानला सलग दुसरा झटका, ऑस्ट्रेलियाची विजयी घौडदौड

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (Women’s World Cup 2022) मध्ये पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.
Alyssa Healy
Alyssa HealyDainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (Women’s World Cup 2022) मध्ये पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण भारतापाठोपाठ आता पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे सलग दोन सामने गमावल्याने त्यांचा स्पर्धेतील पुढे जाण्याचा मार्ग कठीण बनला आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर (Australia) 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तान (Pakistan) संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही दुसरी मोठी धावसंख्या होती, तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अ‍ॅलिसा हिलीच्या (Alyssa Healy) शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानकडून दिलेले लक्ष्य 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. (Pakistan also lost to Australia)

Alyssa Healy
Women’s World Cup 2022: झुलन गोस्वामी मोडणार रेकॉर्ड, न्यूझीलंडविरुद्ध मोठी शक्यता!

दरम्यान, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 12 धावांनी पराभव करत पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव केला होता. त्याच वेळी, पाकिस्तानने भारताविरुद्ध पहिला सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांचा 107 धावांनी पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धचा सामना 92 चेंडू राखून जिंकला.

हिलीने पाकिस्तानला झटका दिला!

पाकिस्तानने दिलेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडविरुद्ध दमदार खेळी करणारी रॅचेल हॅन्स मात्र पाकिस्तानविरुद्ध ३४ धावा करुन बाद झाली. दुसरीकडे अ‍ॅलिसा हिली एका बाजूने संघाला सावरत होती. तिने रॅचेल हॅन्ससोबत पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र लॅनिंग 35 धावा करुन बाद झाली. त्याचवेळी अ‍ॅलिसा हिलीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

दुसरीकडे, अ‍ॅलिसा हिलीने 79 चेंडूत 72 धावा केल्या, ज्यामुळे तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तिच्या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. यानंतर पेरी आणि मुनी यांनी मिळून संघाला विजयाचे दर्शन घडवले. पेरी 26 धावांवर नाबाद राहिली तर मूनीने 23 धावा केल्या.

पाकिस्तानने 6 गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या होत्या

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या संघाने 50 षटकांत 6 बाद 190 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार बिस्माह मारुफने सर्वाधिक नाबाद 78 तर आलिया रियाझने 53 धावा केल्या. खराब सुरुवातीनंतरही संघाला 190 धावांपर्यंत नेण्यात या दोघींनी 99 धावांची भागीदारी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com