फुटबॉल विकासात संघटित कार्य हवे : ब्रह्मानंद शंखवाळकर

खेळात मुलांच्या विकासाचे समान ध्येय गरजेचे
Organized work is needed in football development Brahmanand Shankhwalkar
Organized work is needed in football development Brahmanand ShankhwalkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात फुटबॉल खेळाच्या विकासात सर्व संबंधितांकडून संघटित कार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोवा फुटबॉल विकास मंडळाचे (जीएफडीसी) अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी केले. गोव्याचे पहिले अर्जुन पुरस्कार विजेते बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर जीएफडीसी दशकपूर्ती सोहळ्यात बोलत होते.

क्रीडा व युवा व्यवहार खाते, गोवा क्रीडा प्राधिकरण, गोवा फुटबॉल असोसिएशन यांनी मुलांकडे फुटबॉलमधील भविष्य या नजरेने पाहत त्यांचा विकास साधण्याचे समान ध्येय बाळगणे गरजेचे आहे, असे ब्रम्हानंद पुढे म्हणाले. ते दोन वर्षांपासून जीएफडीसी अध्यक्षपदी आहेत.

(Organized work is needed in football development : Brahmanand Shankhwalkar)

Organized work is needed in football development Brahmanand Shankhwalkar
सावत्र बापाचा खून करून मृतदेह पुरून टाकला; 10 वर्षानंतर लागला खुनाचा छडा

कार्यक्रमास जीएफडीसी सदस्य अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कुतिन्हो, आवेर्तान फुर्तादो, कायतान फर्नांडिस, शांताराम नाईक, संजीव नागवेकर, प्रदीप चोडणकर, व्हालेंत फर्नांडिस, लेक्टर मस्कारेन्हास यांची उपस्थिती होती.

राज्यात सध्या जीएफडीसीची 40 केंद्रे कार्यरत आहेत. दशकपूर्तीनिमित्त बांबोळी येथे झालेल्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात डीएसवायए-एसएजी संघाने जीएफडीसी संघावर 2-0 फरकाने मात केली.

हर्ष पत्रे याचे कौतुक

भारताच्या 20 वर्षांखालील फुटबॉल संघातून सध्या सॅफ स्पर्धेत खेळणारा गोमंतकीय मध्यरक्षक हर्ष पत्रे याचे ब्रह्मानंद यांनी कौतुक केले. जीएफडीसीच्या मये येथील केंद्रात हर्ष याने 2013 साली पायाभूत प्रशिक्षणास सुरवात केली. तेथूनच तो प्रगती साधत गेला, असे ते म्हणाले. गोव्यातील

फुटबॉलपटूंना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत करार मिळत आहेत, याकडे भारताचे माजी कर्णधार ब्रह्मानंद यांनी लक्ष वेधले. हल्लीच क्लॅरेन्स फर्नांडिस, फेलिक्ससन फर्नांडिस यांना बंगळूर एफसीने तीन वर्षांखालील करारबद्ध केले. ‘‘खेळाडू तयार करून ते राष्ट्रीय अथवा व्यावसायिक क्लबकडे सुपूर्द करणे हे आमच्यासमोर आव्हानात्मक आहे,’’ असे ब्रह्मानंद म्हणाले.

मनोहर पर्रीकर यांची दूरदृष्टी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दूरदृष्टी बाळगून दहा वर्षांपूर्वी विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषणात फुटबॉलला राज्य खेळ जाहीर केले होते आणि नंतर जीएफडीसीची निर्मिती केली होती. पर्रीकर यांचा संकल्प पुढे नेण्याची आणि उद्दिष्ट्य साध्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जीएफडीसी उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत आजगावकर यांनी केले.

क्रीडा खात्याचा पाठिंबा

दशकपूर्तीनिमित्त जीएफडीसीचे अभिनंदन करताना क्रीडा संचालक अजय गावडे यांनी राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी क्रीडा व युवा व्यवहार खाते, तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून सर्वतोपरी पाठिंबा कायम राहील, अशी ग्वाही दिली. संबंधितांनी खेळात सकारात्मक बदल राबविणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com