अलीकडच्या काळात टी -20 क्रिकेटला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. कसोटी क्रिकेट (Test Cricket) आणि एकदिवसीय क्रिकेटपेक्षा (ODI Cricket) टी -20 क्रिकेट खेळाडू जास्त पसंत करतात. कसोटी क्रिकेटपेक्षा एकदिवसीय क्रिकेट खेळाला जास्त लोकप्रियता मिळाली होती. परंतू, सध्या टी -20 क्रिकेटने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. अनेक देशांनी आपल्या देशाच्या टी-20 लीग बनवल्या आहेत. भारतात आयपीएल (IPL 2021) तसेच ऑस्ट्रेलियात बिग- बॅश (Big Bash League) लीग आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या सुपर लीगलाही (PSL) बरेच यश मिळाले आहे. टी -20 क्रिकेटमध्ये फलंदाजांना ताबडतोब धावा कराव्या लागतात. आजच्या काळात टी -20 क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. पण 90 च्या दशकातील सुपरस्टार खेळाडूची कारकीर्द टी -20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर लगेच संपली. हेच कारण आहे की बर्याच महान क्रिकेटरने त्यांच्या कारकीर्दीत टी -20 क्रिकेट खेळले नाही. परंतू, काही महान खेळाडू देखील आहेत ज्यांना टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. (The only T20 match played by 4 veterans of international cricket)
सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 2013 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 1989 मध्ये कराची येथे पहिला कसोटी सामना खेळणार्या सचिनने अखेरचा कसोटी सामना 16 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. सचिनने वनडे आणि कसोटी सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. कसोटीत सचिनने 15,921 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यात तो 18,426 धावा करण्यास यशस्वी झाला. पण विशेष म्हणजे सचिनने आपल्या कारकीर्दीत टी -20 आंतरराष्ट्रीय सामना देखील खेळला आहे. 2006 मध्ये सचिनने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, हा भारतीय टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील पहिला सामनादेखील होता. सचिनने आपल्या पहिल्या टी -20 सामन्यात 10 धावांची खेळी केली होती. याशिवाय तेंडुलकरने एक विकेटही घेतली. हा सामना 6 विकेटने जिंकण्यात भारताला यश आले आहे.
इंझमाम उल हक
पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज इंझमाम-उल-हक (Inzamam-Ul-Haq) देखील आपल्या कारकीर्दीत टी -20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यात यशस्वी झाला आहे. 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंझमामने पाकिस्तानकडून टी -20 सामना खेळला आणि 11 धावांची नाबाद खेळी खेळली. तसेच, इंझमामने एकदिवसीय सामन्यात 11,739 धावा केल्या आहेत तर कसोटीत त्याने 8,830 धावा केल्या.
राहुल द्रविड
महान खेळाडू राहुल द्रविडलाही (Rahul Dravid) टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत फक्त 1 टी -20 सामना खेळण्याची संधी मिळाली होती. 2012 मध्ये द्रविडने इंग्लंड विरुद्ध एकमेव टी -20 सामना खेळला होता आणि या सामन्यात त्याने 32 धावांचे तुफानी खेळी केली होती. 32 धावांच्या डावात राहुलने 3 षटकारही ठोकले.
जेसन गिलेस्पी
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीनेही आपल्या कारकीर्दीत टी -20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. 2005 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात गिलस्पीने त्याच्या कारकिर्दीतील पहिला आणि एकमेव टी -20 सामना खेळला, या सामन्यात गिलेस्पीने 18 चेंडूत 24 धावा केल्या आणि एक विकेट घेण्यातही यशस्वी ठरला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.