पणजी: राज्यातील क्रिकेटपटूंसाठी (Cricketers) मोसमपूर्व शिबिर प्रक्रिया सुरू करण्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनने (GCA) निश्चित केले असून खेळाडूंची ऑनलाईन (Online) तंदुरुस्ती शिबिर बुधवारपासून सुरू केले जाणार असल्याची माहिती क्रिकेट प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांनी 14 जुन रोजी दिली. (Online fitness camp for cricketers in Goa)
गतवर्षी गोव्याने लॉकडाऊन आणि नंतर पावसाळ्यात खेळाडूंसाठी ऑनलाईन तंदुरुस्ती शिबिर घेतले होते, त्यामुळे नोव्हेंबरमध्ये संघाचे ऑनफिल्ड सराव शिबिर सुरू झाल्यानंतर खेळाडूंची तंदुरुस्ती उत्कृष्ट ठरली होती, त्याच धर्तीवर यंदाही अशाचप्रकारे क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्तीवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सुरवातीस आम्ही सीनियर क्रिकेटपटूंसाठी शिबिर सुरू करणार आहोत. गतवर्षीच्या शिबिरातील खेळाडूंना त्यात सामावून घेतले जाईल. बुधवारी नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारपासून खेळाडूंना ऑनलाईन तंदुरुस्तीसाठी दरदिवशी उपक्रम दिला जाईल, काही दिवसानंतर सीनियर महिला क्रिकेटपटूंसाठीही तंदुरुस्तीचाही असाच कार्यक्रम राबविला जाईल, असे मयेकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणू महामारीमुळे राज्यात सध्या निर्बंध आहेत. ते हटविले आणि खेळाडू मैदानावर येण्यायोग्य परिस्थिती तयार झाल्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर खेळाडूंसाठी मैदानावरील शिबिर सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन असेल, असेही मयेकर यांनी नमूद केले.
तंदुरुस्ती पुनर्वसनावर भर
मोसमपूर्व कालाखंडात खेळाडूंची तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याने त्या दृष्टिकोनातून खेळाडूंसाठी संघाचे ट्रेनर आणि फिजिओ कार्यक्रम तयार करतील. काही खेळाडू गतमोसमात दुखापतग्रस्त होते, त्यांच्यासाठी तंदुरुस्ती पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने अभ्यास केला जाईल. शिबिरातील खेळाडूंसाठी गटवार ऑनलाईन शिबिर असेल आणि नित्यनेमाने या खेळाडूंची ऑनलाईन संवादही साधला जाईल, असे मयेकर यांनी स्पष्ट केले.
निनाद संघाचे ट्रेनर
जीसीएने सीनियर क्रिकेट संघासाठी गोव्याचे माजी क्रिकेटपटू निनाद पावसकर यांची ट्रेनरपदी नियुक्ती केली आहे. गतमोसमातील ट्रेनर अर्जुन बासू यंदा जीसीएच्या सेवेत नाहीत, त्यामुळे पावसकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याचे प्रकाश मयेकर यांनी सांगितले. ट्रेनरसाठी पात्रता मिळविताना निनाद यांनी यावर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियन स्ट्रेंग्थ अँड कंडिशनिंग असोसिएशनचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना लेव्हल-१ प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.