India vs England, 1st Test at Hyderabad, Ollie Pope Century:
हैदराबादमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून ऑली पोपने 196 धावा केल्या, याबरोबरच त्याने एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरले होते. इंग्लंडकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ऑली पोपने सरुवातीपासून चांगली फलंदाज करत अन्य फलंदाजांना साथीला घेत डाव पुढे नेला.
मात्र, द्विशतकाला अवघ्या 4 धावांची गरज असताना तो दहाव्या विकेटच्या रुपात बाद झाला. त्यामुळे इंग्लंडचा डावही चौथ्या दिवशी 102.1 षटकात 420 धावांवर संपुष्टात आला. पोपने 278 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 196 धावांची खेळी केली.
दरम्यान, ऑली पोप भारतामध्ये संघाच्या दुसऱ्या डावात सर्वोच्च खेळी करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांक मिळवला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर अँडी फ्लॉवर असूण त्यांनी झिम्बाब्वेकडून 2000 साली नागपूर कसोटीत दुसऱ्या डावात नाबाद 232 धावा केल्या होत्या.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर सध्या इंग्लंडचा प्रशिक्षक असलेला ब्रेंडन मॅक्युलम आहे. त्याने न्यूझीलंडकडून 2010 साली हैदराबाद कसोटीतच दुसऱ्या डावात 225 धावांची खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर गारफिल्ड सोबर्स यांनी 1958 साली कानपूर कसोटीत वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावत 198 धावा केल्या होत्या.
भारतामध्ये संघाच्या दुसऱ्या डावात सर्वोच्च खेळी करणाऱ्या विदेशी फलंदाज
232* धावा - अँडी फ्लॉवर, नागपूर, 2000
225 धावा - ब्रेंडन मॅक्युलम, हैदराबाद, 2010
198 धावा - गारफिल्ड सोबर्स, कानपूर, 1958
196 धावा - ऑली पोप, हैदराबाद, 2024
188* धावा - सईद अन्वर, कोलकाता 1999
दरम्यान, इंग्लंडचा डाव 420 धावांवर संपुष्टात आल्याने पहिल्या डावातील १९० धावांच्या पिछाडीमुळे त्यांनी भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.