Woman Cricketer: महिला क्रिकेटरचा मृतदेह जंगलात आढळला, कुटुंबीयांचा खूनाचा आरोप

Odisha News: क्रिकेटप्रेमींसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे असणार आहे. यावर्षी प्रथमच 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.
Murder Case
Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Woman Cricketer Dead Body Found: क्रिकेटप्रेमींसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचे असणार आहे. यावर्षी प्रथमच 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा शनिवारपासून (14 जानेवारी) सुरु होणार आहे. मात्र, याआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओडिशाची (Odisha) महिला क्रिकेटर राजश्री स्वैनी हिचा मृतदेह जंगलात सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजश्री 11 जानेवारीपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह शुक्रवारी (13 जानेवारी) कटकजवळील घनदाट जंगलात झाडाला लटकलेला आढळून आला. याबाबत पोलिसांनी (Police) माहिती दिली. कटकचे डीसीपी पिनाक मिश्रा यांनी सांगितले की, राजश्रीचा मृतदेह अथागढ भागातील गुरडिजाटिया जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

Murder Case
Zimbabwe Cricket: महिन्याभरात क्रिकेटर पती-पत्नीचा रहस्यमयी मृत्यू, झिम्बाब्वे क्रिकेटला धक्का

प्रशिक्षकाने बेपत्ता झाल्याची एफआयआर दाखल केली होती

डीसीपी पिनाक मिश्रा पुढे म्हणाले की, "गुरडिजाटिया पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे." त्यांनी पुढे सांगितले की, राजश्रीच्या प्रशिक्षकाने गुरुवारी (12 जानेवारी) कटकमधील मंगलाबाग पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही. दुसरीकडे, राजश्रीच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Nashik Live In Partner Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com