Hockey World Cup: वर्ल्डकपपूर्वीच भारतीय हॉकी संघावर बक्षीसांचा वर्षाव, ओडिशा CM कडूनही मोठी घोषणा

ओडिशाचे मुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकी संघासाठी मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
Odisha CM Naveen Patnaik announced 1 crore to each India players if team wins Hockey World Cup
Odisha CM Naveen Patnaik announced 1 crore to each India players if team wins Hockey World CupDainik Gomantak

Hockey India: भारतात 13 ते 29 जानेवारी दरम्यान हॉकी वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. हा वर्ल्डकप ओडिशामधील भुवनेश्वर-राउरकेला येथे होणार आहे. या वर्ल्डकपसाठी परदेशी खेळाडूंचे भारतात आता आगमन होत आहे. दरम्यान आता हा वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे.

नवीन पटनायक यांनी जाहीर केले आहे की जर भारतीय हॉकी संघ मायदेशात होणारा हा वर्ल्डकप जिंकला, तर संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

गुरुवारी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम काँम्पेक्स, राउरकेला येथे विकसित केलेल्या वर्ल्डकप व्हिलेजच्या उद्घाटनासाठी पटनाईक उपस्थित होते. उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्यात आले. हे वर्ल्डकप व्हिलेज 9 महिन्यामध्ये तयार करण्यात आले आहे.

या वर्ल्डकप व्हिलेजमध्ये 225 खोल्या असून यामध्ये स्पर्धेत सहभागी होणारे 16 संघांचे सदस्य आणि हॉकी वर्ल्डकपचे अधिकारी राहातील. तसेच यामध्ये प्रक्टिस सेंटरही आहे. तसेच इथे ताज ग्रुपकडे सर्व सेवा पुरवण्याचे आणि आदरातिथ्य करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

(Odisha CM Naveen Patnaik announced 1 crore to each India players if team wins Hockey World Cup 2023)

उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान पटनाईक म्हणाले, 'जर आपल्या संघाने वर्ल्डकप जिंकला, तर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांनी गौरविण्यात येईल. मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो आणि आशा करतो की ते विजेतेपद जिंकतील.'

दरम्यान, खेळाडूंनीही मुख्यमंत्र्यांचे आणि ओडिशा सरकारचे आभार मानले आहेत. ओडिशा भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकही आहेत.

गुरुवारी वर्ल्डकप व्हिलेजच्या उद्घाटनासाठी ओडिशाचे क्रीडामंत्री टीके बेहरा, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्यासह ओडिशा सरकार आणि हॉकी इंडियामधील अनेक अधिकारी उपस्थित होते.

हॉकी इंडियाकडूनही बक्षीसाची घोषणा

काहीदिवसांपूर्वीच हॉकी इंडियाकडूनही भारतीय संघासाठी बक्षीस रकमेची घोषणा करण्यात आली होती. हॉकी इंडियाने केलेल्या घोषणेप्रमाणे या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने विजेतेपद जिंकत सुवर्णपदक जिंकले तर प्रत्येक खेळाडूला 25 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफ सदस्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर जर रौप्य पदक मिळाले, तर प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना 3 लाख रुपये देण्यात येतील. तसेच जर कांस्य पदक जिंकले, तर प्रत्येक खेळाडूला 10 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com