नॉर्थईस्टची केरळा ब्लास्टर्सशी गोलशून्य बरोबरी!

सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium) झाला.
Northeast United & Kerala Blasters
Northeast United & Kerala BlastersDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात अतिशय निरस ठरलेल्या लढतीत गुरुवारी नॉर्थईस्ट युनायटेडने (Northeast United) केरळा ब्लास्टर्सला (Kerala Blasters) गोलशून्य बरोबरीत रोखले. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील ही पहिलीच गोलशून्य बरोबरी ठरली. केरळा ब्लास्टर्सने गमावलेल्या गोल करण्याच्या सोप्या संधी, तसेच सामन्याच्या अंतिम टप्प्यातील नॉर्थईस्ट युनायटेडच्या सुभाशिष रॉय याचे दक्ष गोलरक्षण हे अपवाद वगळता सामना रटाळ ठरला. चेंडू बहुतांश वेळ मध्यक्षेत्रातच रेंगाळला. बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. अगोदरच्या लढतीत पराभूत झालेल्या केरळा ब्लास्टर्स, तसेच नॉर्थईस्ट युनायटेडने आता गुणतक्त्यात दुसऱ्या लढतीनंतर गुणखाते उघडले आहे.

Northeast United & Kerala Blasters
माजी बंगळूर एफसीच्या पराभवाचे मुख्य कारण बनले सुपरस्टार खेळाडूचे अपयश

सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्ट युनायटेडचा कर्णधार सुभाशिष रॉय याच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे केरळा ब्लास्टर्सला आघाडीपासून दूर राहावे लागले. निशू कुमारच्या असिस्टवर अल्वारो व्हाझकेझ याने शानदार हेडिंग साधले होते. यावेळी चेंडूच्या नेटच्या दिशेने जात असताना सुभाशिषने स्वतःला पूर्णपणे झोकून घेत अफलातून कसब प्रदर्शित करत चेंडूची दिशा बदलली आणि गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

त्यापूर्वी, 54व्या मिनिटास जॉर्जे परेरा डायझ याने अगदी सोपी संधी वाया घालविल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला आघाडीपासून वंचित राहावे लागले होते. 36व्या मिनिटासह केरळा ब्लास्टर्सला आघाडीची संधी होती, परंतु तेव्हाही समोर केवळ गोलरक्षक असताना परेरा डायझ अचूक फटका मारू शकला नव्हता. ही संधी अतिशय सोपी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com