Diamond League 2023: धाकड सज्ज! दुखापतीतून सावरत नीरज गाजवणार लुसान डायमंड लीग

Neeraj Chopra: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरला आहे. तो पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे.
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak
Published on
Updated on

Diamond League 2023: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरला आहे. तो पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. नीरज 30 जून रोजी लुसान डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहे.

आयोजकांनी सहभागी खेळाडूंची यादी जाहीर केली असून त्यात चोप्राचेही नाव आहे. नीरज चोप्रा व्यतिरिक्त अव्वल भारतीय खेळाडू जेस्विन ऑल्ड्रिन आणि श्रीशंकर यांची नावे आहेत.

दरम्यान, स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर अलीकडेच असे म्हटले आहे की, भालाफेकमध्ये भारतीय ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राला (Neeraj Chopra) चेकचे जेकब वडलेच आणि जर्मन ज्युलियन वेबर यांचे आव्हान असेल.

Neeraj Chopra
Diamond League मध्ये श्रीशंकरची लांब उडीत विक्रमी कामगिरी! नीरज चोप्राच्या पंक्तीत मिळवले स्थान

प्रशिक्षणादरम्यान नीरजला दुखापत झाली

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चोप्रा यांनी गेल्या महिन्यात ट्विटरवर जाहीर केले होते की, प्रशिक्षणादरम्यान स्नायूंना ताण आला होता आणि खबरदारी म्हणून नेदरलँड्समधील (Netherlands) एफबीके गेम्स (जून 4) आणि फिनलंडमधील पावो नूरमी मीटमधून माघार घेतली होती. भुवनेश्वरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने भाग घेतला नाही.

Neeraj Chopra
Champions League SF 2023: रोमांचक सेमीफायनलमध्ये सिटीने मद्रिदविरुद्ध साधली बरोबरी, डी ब्रुयन गोल ठरला महत्त्वाचा

दोहा येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले

दुसरीकडे, नीरज चोप्राने 5 मे रोजी दोहा येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर फेक करुन सुवर्णपदक जिंकले. त्यानंतरच सराव सत्रात त्याला दुखापत झाली होती. बुडापेस्ट (हंगेरी) येथे 19 ते 27 ऑगस्ट दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. येथे नीरज सुवर्ण जिंकण्याचा प्रयत्न करेल. यानंतर त्याला डायमंड लीग फायनल्स आणि आशियाई गेम्समध्येही भाग घ्यायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com