Neeraj Chopra: '...तर त्याचा स्पीड आणखी वाढेल', नीरज चोप्राचा आवडत्या गोलंदाजाला मैत्रीपूर्ण सल्ला

Jasprit Bumrah: नीरज चोप्राने वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील भारताच्या पराभवाबद्दलही भाष्य केले आहे.
Neeraj Chopra | Jasprit Bumrah
Neeraj Chopra | Jasprit Bumrah

Neeraj Chopra Advice for Jasprit Bumraj:

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आत्तापर्यंत अनेकदा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारताला मोठे विजय मिळवून दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने पाठीच्या दुखापतीनंतर तब्बल 11 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनराहमन केले आहे.

याबद्दल आता भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने कौतुक केले आहे. याबरोबरच त्याने एक सल्लाही बुमराहला दिला आहे. 25 वर्षीय नीरजने सांगितले आहे की बुमराह त्याचा वेग आणखी कसा वाढवू शकतो.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना नीरज म्हणाला, 'मला जसप्रीत बुमराह आवडतो, मला त्याची ऍक्शन वेगळी वाटते.

'मला वाटते त्याने जर त्याचा रनअप आणखी मोठा घेतला, तर तो गोलंदाजीत आणखी वेग आणू शकतो. एक भालाफेकपटू म्हणून आम्ही बऱ्याचदा गोलंदाज त्यांचा वेग कसा वाढवू शकतो, जर त्यांनी त्यांचा रनअप आणखी थोडा मागून चालू केला तर, यावर चर्चा करत असतो. मला बुमराहची स्टाईल आवडते.'

Neeraj Chopra | Jasprit Bumrah
Neeraj Chopra: 'फेका तर असे फेका की चार लोक...', नीरजसाठी सेहवागने केलेली पोस्ट चर्चेत

बुमराह सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान क्रिकेटपासून पाठीच्या दुखापतीमुळे दूर होता. यादरम्यान, त्याला पाठीवर शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली. पण त्यानंतर त्याने ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतून यशस्वी पुनरागमन केले होते. तसेच त्याने आशिया चषक 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतही भारतासाठी चांगली कामगिरी केली होती.

वर्ल्डकप 2023 बद्दलही नीरज म्हणाला...

दरम्यान, वर्ल्डकप 2023 स्पर्धेत यजमान भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता. या सामन्यासाठी नीरज देखील उपस्थित होता.

Neeraj Chopra | Jasprit Bumrah
Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्समध्ये फुट? बुमराहच्या 'त्या' पोस्टने खळबळ

त्याने या सामन्याबद्दलही आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली होती, ज्याचा त्यांना फायदा झाला.

नीरज म्हणाला, 'कदाचीत, कुठेतरी मानसिकरित्या ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला पकड मिळवली. जेव्हा ते गोलंदाजी करत होते, तेव्हा मला वाटते त्यांची कणखर मानसिकता होती. अखेरीस त्यांनी पूर्ण सामन्यावर पकड मिळवलेली होती. त्यांच्या खेळाबाबत त्यांना पूर्ण विश्वास होता.'

अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे आव्हान ठेवले होते, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 43 षटकात ट्रेविस हेडच्या शतकाच्या जोरावर सहज पूर्ण केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com