National Games 2023: कसा आहे पारंपरिक शीख मार्शल आर्ट प्रकार 'गतका'? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ठरतोय लक्षवेधी

गोव्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत जास्त लोकप्रिय
National Games 2023 Goa | Gatka
National Games 2023 Goa | Gatka Dainik Gomantak
Published on
Updated on

National Games Goa 2023: गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गताका या खेळाचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक शीख मार्शल आर्ट प्रकार असलेल्या या खेळात गोमंतकीयांनी कौशल्य आत्मसात केले असून महाविद्यालयीन विद्यार्थांत लोकप्रिय ठरला आहे.

कांपाल येथील स्पर्धा क्रीडानगरीत मंगळवारपासून गताका लढतींना सुरवात झाली. गोव्याचा 22 सदस्यीय चमू स्पर्धेत सहभागी झाला आहे.

कराटेतील ब्लॅक बेल्ट आणि तामिळनाडूत लोकप्रिय असलेल्या 'सिलंबम' या मार्शल आर्टचे अभ्यासक सेबी फर्नांडिस यांचे गोवा संघातील सर्व सदस्यांना प्रशिक्षण लाभले आहे.

गोवा संघात स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थी असून हा खेळ गोवा राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास सेबी यांनी वाटतो.

National Games 2023 Goa | Gatka
National Games 2023: श्रुंगी, संजनामुळे गोव्याच्या खात्यात 2 पदके; राज्याला आत्तापर्यंत एकूण 30 पदके

सतराव्या शतकातील खेळ

गताका हा एक पारंपरिक शीख मार्शल आर्ट प्रकार आहे. हा खेळ मूळ 17 व्या शतकात आहे. जेव्हा निहंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीख योद्ध्यांनी आत्मसंरक्षण आणि त्यांच्या श्रद्धेचे रक्षण करण्याचे साधन म्हणून या प्रकारास विकसित केले.

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष व महिला मिळून 176 खेळाडू सहभागी झाले आहेत.

गताका खेळास मिळाले प्रोत्साहन

भारतीय गताका महासंघाचे (जीएफआय) सचिव बलजिंदरसिंग तूर यांनी सांगितले, की ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गतकाचा समावेश केल्याने या खेळास प्रोत्साहन मिळणार आहे. हा खेळ आता अखिल भारतीय स्तरावर विस्तारण्यासाठी सज्ज झाला आहे.

National Games 2023 Goa | Gatka
Rani Rampal: हॉकी संघाची माजी कर्णधार चौथ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी; भारताकडून नोंदवलेत 120 गोल

या वर्षीची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आसाममध्ये ऑगस्टमध्ये झाली. यामुळे या खेळाला आपली मजल दूरपर्यंत मारणे शक्य झाले.’’ जवळपास 25 राज्यांमध्ये गतका खेळ रुजत असल्याची माहिती तूर यांनी दिली.

‘गताका’चा अर्थ

या खेळाची थोडक्यात माहिती देताना प्रशिक्षक तलविंदर सिंग यांनी सांगितले, की गताका हा तीन शब्दांपासून तयार झाला आहे, ‘ग’ म्हणजे गती (वेग), ‘ता’ म्हणजे ताळमेळ (समन्वय) आणि ‘का’ म्हणजे समय (वेळ) आणि या खेळात शारीरिक तंदुरुस्तीच्या सर्व घटकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com