IND vs ENG: ''त्याचा प्रवास आणि यश...''; अश्विनचे 500 बळी अन् PM मोदींकडून विशेष कौतुक

India vs England 3rd Test Rajkot: भारतीय संघाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर एक मोठी कामगिरी केली.
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwin Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs England 3rd Test Rajkot:

भारतीय संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर एक मोठी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याच्याशिवाय फक्त अनिल कुंबळेने 500 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, आता या कामगिरीसाठी अश्विनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दिग्गज ऑफस्पिनरला प्रोत्साहन दिले आहे. अश्विनचे ​​अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी त्याने आपल्या कौशल्याने ही कामगिरी केल्याचे म्हटले.

दरम्यान, आपल्या ​अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अश्विनचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, "रविचंद्रन अश्विनचे ​​500 कसोटी विकेट्स घेण्याच्या असामान्य कामगिरीबद्दल अभिनंदन! त्याचा प्रवास आणि यश हे त्याच्या कौशल्य आणि चिकाटीचा दाखला आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. तो आणखी नव्या उंचीवर पोहोचणार आहे."

Ravichandran Ashwin
IND vs ENG: सर्फराजनंतर ध्रुव जुरेलने लुटली मैफील; पदार्पणातच भारतीय दिग्गजाचा 30 वर्ष जुना विक्रम मोडला

तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा आर अश्विन हा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. अनिल कुंबळे 619 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्याने अश्विनचे ​​अभिनंदनही केले. कुंबळेने म्हटले की, 'तु कमीत-कमी 630 विकेट घ्याव्यात.' सचिन तेंडुलकरनेही अश्विनचे तोंडभरुन कौतुक केले. अश्विन सचिन तेंडुलकरसोबतही खेळला आहे.

Ravichandran Ashwin
IND vs ENG: बेन डकेटने मोडला एमएस धोनीचा रेकॉर्ड; वीरेंद्र सेहवाग अजूनही नंबर वन

दुसरीकडे, अश्विनने 98 व्या कसोटी सामन्यात 500 बळींचा आकडा गाठला होता, तर अनिल कुंबळेने 105 कसोटी सामन्यात इतक्या विकेट घेतल्या होत्या. 100 पेक्षा कमी कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी करणारा अश्विन हा जगातील दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या पुढे श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने 90 पेक्षा कमी सामन्यात 500 कसोटी विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com