Mustafizur Rahman: बॉल डोक्याला लागून बांगलादेशी खेळाडू रक्तबंबाळ, तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल; वाचा नक्की काय झालं

Mustafizur Rahman Injury: सरावादरम्यान बांगलादेशी खेळाडूचं बॉल लागून डोकं फुटलं, त्यामुळे त्याला टाकेही घालण्यात आले.
Mustafizur Rahman
Mustafizur RahmanX

Mustafizur Rahman rushed to hospital after hit by ball on the head:

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमान बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये कोमिला विक्टोरियन्सकडून खेळत आहे. दरम्यान, या संघासह सराव करत असताना रविवारी (18 फेब्रुवारी) त्याचं चेंडू लागून डोकं फुटलं.

तो संघासह चितगावमधील झहुर अहमद चौधरी स्टेडियममध्ये सराव करत होता. यावेळी मॅथ्यू फोर्डेने मारलेल्या शॉटवर मुस्तफिजूरच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जोरात चेंडू लागला. त्यामुळे झालेल्या जखमेतून रक्तस्त्रावही. त्यामुळे त्याच्यावर लगेचच आधी प्रथमोपचार करण्यात आले आणि मग तातडीने हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले.

Mustafizur Rahman
IND vs ENG: इंग्लंडच्या बझबॉलवर जयस्वाल भारी! 12 षटकार अन् 14 चौकारांसह डबल सेंच्युरी करत रचला विक्रमांचा डोंगर

या घटनेबद्दल कॉमिला विक्टोरियन्सचे फिजिओ यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की मुस्तफिजूरला कोणतीही अंतर्गत दुखापत झालेली नाही.

त्यांनी लिहिले आहे की 'सरावादरम्यान मुस्तफिजूर रेहमानच्या डोक्याच्या डाव्या बाजूला चेंडू थेट लागला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यामुळे आम्ही रक्तस्त्राव थांबवण्यासाठी काँप्रेशन बँडेज वापरले आणि लगेचच त्याला इंपेरियल हॉस्पिटलमध्ये हालवले.'

'सीटी स्कॅननंतर असे समजले की ही केवळ बाह्य स्वरुपातील दुखापत आहे. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव झालेला नाही. सध्या त्याच्या जखमेवर टाके घालण्यात आले आहेत. तो आता संघाच्या फिजिओच्या देखरेखीखाली आहे.'

Mustafizur Rahman
IND vs ENG: कुलदीप-गिलचा उडाला गोंधळ अन् सेंच्युरीसाठी 9 धावांची गरज असताना स्टोक्सने केलं रनआऊट

दरम्यान, आता या दुखापतीमुळे मुस्तफिजूर सोमवारी सिलिहेत स्ट्रायकरविरुद्ध होणाऱ्या सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. मुस्तफिजूर बांगलादेश प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत आत्तापर्यंत 9 सामने खेळला असून त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत.

सीएसकेकडून खेळणार मुस्तफिजूर

दरम्यान, मुस्तफिजूरला आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामासाठी एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या लिलावात त्याच्यासाठी सीएसकेने 2 कोटी रुपये मोजले आहेत.

मुस्तफिजूरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 48 सामने खेळले असून 47 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com