आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स (MI vs DC) ची सुरुवात पराभवाने झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने रोमहर्षक सामन्यात मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला. एकवेळ मुंबई इंडियन्सचा विजय निश्चित वाटत होता, मात्र अक्षर पटेल (Akshar Patel) आणि ललित यादव यांच्या भागीदारीने मुंबईच्या संघाची (Mumbai Indians) दाणादाण उडाली. दिल्लीचे 14 षटकांत 104 धावांत 6 गडी बाद करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. शेवटच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी सर्वाधिक धावा दिल्या. विशेषत: डॅनियल सॅम्सने अवघ्या 4 षटकांत 57 धावा दिल्या. दुसरीकडे मात्र मुंबई इंडियन्ससाठी (Delhi Capitals vs Mumbai Indians) पहिल्या सामन्यात एक सकारात्मक गोष्ट घडली ती, म्हणजे लेग-स्पिनर मुरुगन अश्विनची (Murugan Ashwin) शानदार कामगिरी. मुरुगन अश्विनने दिल्लीविरुद्ध (Delhi Capitals) 4 षटकांत केवळ 14 धावा देत 2 बळी घेतले. (Mumbai Indians leg spinner Murugan Ashwin's brilliant performance against Delhi Capitals in IPL 2022)
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या या लेगस्पिनरने आपल्या यशाचे श्रेय सचिन तेंडुलकरला दिले आहे. मुरुगन अश्विनने सांगितले की, 'मला ब्रेबॉर्न स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्याकडून माहिती मिळाली.' ज्याचा मला सामन्यादरम्यान फायदा झाला. मुरुगन अश्विन पुढे म्हणाला, ''मला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. मी सचिनचा खूप मोठा चाहता आहे. सचिन तेंडुलकरकडून पदार्पणाची कॅप मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्याचबरोबर मला सचिनशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. मी सचिनशी ब्रेबॉर्न खेळपट्टीबद्दल बोललो कारण मी, इथे याआगोदर कधीही खेळलो नाही. सचिनने मला ब्रेबॉर्न स्टेडियमबद्दल माहिती दिली.''
मुरुगन अश्विनने फिरकीची ताकद दाखवून दिली
मुरुगन अश्विनने तिसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराह आणि डॅनियल सॅम्सला तडाखेबंद टीम सेफर्टला टॅकल केले होते. अश्विनने टीम सेफर्टला जबरदस्त गुगलीवर बोल्ड केले. सेफर्टने अवघ्या 14 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे तो मुंबईसाठी धोकादायक ठरत होता. त्यानंतर मुरुगनने त्याच षटकात मनदीप सिंगला बाद केले. अश्विनने 4 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले.
मुंबईचे इतर गोलंदाज महागात पडले
मुरुगन अश्विनने चमकदार कामगिरी केली तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहने 3.2 षटकात 43 धावा दिल्या. बासिल थम्पीनेही 4 षटकात 3 गडी बाद 35 धावा दिल्या. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. संघात काही बदल केला तर हा संघ दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास अश्विनने यावेळी व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्सला त्यांचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध 2 एप्रिलला खेळायचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.