IPL 2022: MI ठरला प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ

आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात यशस्वी म्हणून संघ मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते.
Mumbai Indians
Mumbai IndiansDainik Gomantak

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी म्हणून संघ मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते. परंतु हाच संघ लीगच्या 15 व्या हंगामात खराब कामगिरी करताना दिसत आहे. या मोसमात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. सोमवारी डीवाय पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) मुंबईला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावावर आयपीएलच्या इतिहासातील आणखी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 11 सामन्यांमध्ये मुंबईचा हा नववा पराभव होता. (Mumbai Indians have become the first team to be knocked out of the playoff race in IPL 2022)

आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक सामने गमावणारा मुंबई इंडियन्स संघ ठरला

या पराभवानंतर मुंबई इंडियन्स आता आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक सामने गमावणारा पहिला संघ बनला आहे. यापूर्वी मुंबईचा संघ आयपीएलच्या एकाही हंगामात इतके सामने (9) हरले नव्हते. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने यापूर्वी 2018, 2014 आणि 2009 मध्ये 8-8 सामने आणि 2021, 2016 आणि 2012 मध्ये 7-7 सामने गमावले होते.

Mumbai Indians
IPL 2022 |3 संघ प्लेऑफच्या शर्यतीत पुढे; इतर संघांची स्थिती घ्या जाणून

कोलकाताने मुंबईचा 52 धावांनी पराभव केला

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कोलकाताने 20 षटकात 9 गडी गमावून 165 धावा केल्या. संघाच्या वारंवार विकेट पडत राहिल्याने मुंबई इंडियन्सला 166 धावांचे लक्ष्य गाठणे अशक्य बनले. जसप्रीत बुमराहच्या 5 विकेट आणि इशान किशनचे अर्धशतक संघाला विजय मिळवून देण्यात योगदान देऊ शकले नाही. आणि अखेर संघाला 52 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Mumbai Indians
IPL 2022 : गुजरातनंतर आणखी 3 संघ मुंबईच्या निशाण्यावर

याशिवाय, कोलकाताविरुद्ध मुंबईची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2012 मध्ये वानखेडे स्टेडियमवर कोलकाताविरुद्ध 108 धावांत संघ आटोपला होता. आयपीएलच्या इतिहासात कोलकाताने मुंबईला सलग तीन सामन्यांत पराभूत करण्याची ही दुसरी वेळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com