Rohit Sharma records: रोहितचा 'हिट' कारनामा! विराटनंतर 'त्या' दोन विक्रमांना गवसणी घालणारा दुसराच भारतीय

रविवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्धशतक करत विराटप्रमाणेच दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

Rohit Sharma records: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना पार पडला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने 8 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात कॅमेरॉन ग्रीन आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील भागीदारीने महत्त्वाचा वाटा उचलला.

दरम्यान, रोहितने या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना दोन मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितने या सामन्यात 37 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची खेळी केली.

Rohit Sharma
Virat Kohli Record: कोहलीचा डंका! सातवी IPL सेंच्यूरी ठोकत विक्रमांचा पाडला पाऊस, एकदा नजर टाकाच

विराट पाठोपाठ रोहितचाही विक्रम

रोहितने या अर्धशतकी खेळीदरम्यान टी20 कारकिर्दीत 11 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. तो टी20 क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करणारा विराट कोहलीनंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

रोहितच्या आता टी20 कारकिर्दीत 421 सामन्यांमध्ये 30.68 च्या सरासरीने 11016 धावा झाल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तो आता दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या नावावर 374 सामन्यांमध्ये 11965 धावा आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू -

  • 14562 धावा - ख्रिस गेल (463 सामने)

  • 12528 धावा - शोएब मलिक (510 सामने)

  • 12175 धावा - कायरन पोलार्ड (625 सामने)

  • 11965 धावा - विराट कोहली (374 सामने)

  • 11695 धावा - डेव्हिड वॉर्नर (356 सामने)

  • 11392 धावा - ऍरॉन फिंच (382 सामने)

  • 11016 धावा - रोहित शर्मा (421 सामने)

  • 10916 धावा - ऍलेक्स हेल्स (389 सामने)

Rohit Sharma
IPL 2023 Playoff Timetable: टॉप चार संघ निश्चित! केव्हा होणार प्लेऑफच्या मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबईकडून 5000 धावा

रोहित शर्माने या खेळीदरम्यानच मुंबई इंडियन्ससाठी 5000 धावाही पूर्ण केला. रोहितच्या आता 196 सामन्यांमध्ये 29.54 च्या सरासरीने 5022 धावा केल्या. त्यामुळे तो एकाच आयपीएल संघाकडून 5000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी असा विक्रम केवळ विराट कोहलीने केला होता. विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 252 सामन्यांमध्ये 7687 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने मुंबईसमोर 201 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहितव्यतिरिक्त कॅमेरॉन ग्रीन याने नाबाद शतकी खेळी केली. त्याने 100 धावा केल्या. त्यामुळे मुंबईने 18 षटकातच हे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com