मुंबई सिटीची धडाकेबाज कामगिरी, ओडिशाचा 4-1 ने धुव्वा

मुंबई सिटीचा हा 15 लढतीतील सातवा विजय ठरला
Mumbai City FC
Mumbai City FCDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी ः स्पॅनिश इगोर आंगुलो व बिपिन सिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या बळावर पुन्हा सूर गवसलेल्या गतविजेत्या मुंबई सिटीने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football)स्पर्धेत रविवारी धडाकेबाज विजय नोंदविला. सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखत त्यांनी ओडिशा एफसीचा 4-1 फरकाने धुव्वा उडविला आणि गुणतक्त्यात पहिल्या चार संघात स्थान मिळवून प्ले-ऑफ फेरीचा दावाही भक्कम केला.

सामना फातोर्डा (Fatorda)येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. इगोर आंगुलोने अनुक्रमे 41 व 70 व्या मिनिटास प्रत्येक एक गोल केला. त्यामुळे त्याची मोसमातील वैयक्तिक गोलसंख्या दहावर गेली. गेली काही सामने बिपिन सिंग गोलपासून दूर होता. आज त्याने पुन्हा फॉर्म प्राप्त करत अनुक्रमे 47 व 73 व्या मिनिटास गोल केला. या 26 वर्षीय खेळाडूने आता मोसमात पाच गोल नोंदविले आहेत. ओडिशाचा ब्राझीलियन स्ट्रायकर जोनाथस ख्रिस्तियन याने 90 व्या मिनिटास संघाची पिछाडी एका गोलने कमी केली. त्याचा हा मोसमातील सातवा गोल ठरला.

Mumbai City FC
प्रमोद सावंतांनी राहुल गांधींच्या आश्वासनाची उडवली खिल्ली

पराभवाचा वचपा

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात वास्को येथे ओडिशाने मुंबई सिटीस 4-2 फरकाने नमविले होते, त्या धक्कादायक पराभवाचा वचपाही रविवारी डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने काढला. मुंबई सिटीचा हा 15 लढतीतील सातवा विजय ठरला. त्यांचे 25 गुण झाले आहेत. समान गुणसंख्येत जमशेदपूर एफसीला (+8) तिसरा, तर मुंबई सिटीस (+6) चौथा क्रमांक मिळाला. ओडिशा एफसीला 16 लढतीत सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 21 गुणांसह ते सातव्या स्थानी कायम राहिले.

Mumbai City FC
होंडा पंचायत क्षेत्रात मतांची कुणाला आघाडी? 12 मतदान केंद्रांची व्यवस्था

आंगुलो गोल्डन बूटच्या शर्यतीत

मुंबई सिटीच्या38 वर्षीय इगोर आंगुलोने रविवारी दोन गोल नोंदवून सर्वाधिक गोलच्या गोल्डन बूट शर्यतीत आपले आव्हान कायम राखले. त्याचे आता 10 गोल झाले आहे. साखळी फेरीत मुंबई सिटीचे आणखी पाच सामने बाकी आहेत. आंगुलोने गतमोसमातील स्पर्धेत एफसी गोवातर्फे खेळताना 14 गोल नोंदवून गोल्डन बूटचा मान मिळविला होता. हैदराबादचा नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे याने 15 सामन्यांत 14 गोल केले असून तो अव्वल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com