HBD Hardik Pandya: पदार्पण सामन्यातच धोनीने हार्दीकचा घेतला होता 'क्लास'

हार्दिकचा (Hardik Pandya) जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी सुरत जिल्ह्यातील एका गावात झाला.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पंड्याचा आज 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस (Hardik Pandya Birthday) आहे. तो आज 28 वर्षांचा झाला. हार्दिकचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी सुरत जिल्ह्यातील एका गावात झाला. त्याचे बालपण संघर्षांमध्ये गेले. जेव्हा तो 5 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचा व्यवसाय पूर्णपणे संपला होता. कुटुंबाला एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत जाणवत होती. परंतु वडील हिमांशू पंड्या (Himanshu Pandya) यांनी हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल (Krunal Pandya) यांना क्रिकेटपटू करण्याचे स्वप्न भंगू दिले नाही. ते सुरतहून बडोद्याला आले आणि दोन्ही मुलांना किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये (Kiran more cricket academy) पाठवले. आणि हाच निर्णय हार्दिकचे आयुष्य बदलणारा ठरला.

मोरे यांच्या अकादमीमध्ये हार्दिकने क्रिकेटचा खूप सराव केला. आणि तो एक उत्तम फलंदाज तसेच गोलंदाजही बनला. 2013-14 मध्ये त्याने बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच हंगामात हार्दिकने बडोद्याबरोबरची सय्यद मुश्ताक अली करंडक, टी -20 स्पर्धाही जिंकली. त्याला 2015 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करत आपल्या ताफ्यात घेतले. आयपीएलच्या त्याच हंगामात त्याने केकेआरविरुद्ध 31 चेंडूत 61 धावा केल्या. त्याच्या खेळीने सर्वांना अचंबित केले. त्यानंतर त्याने जानेवारी 2016 मध्ये सय्यद मुश्ताक अली करंडकात बडोद्यासाठी 10 डावांमध्ये 377 धावा केल्या. हार्दिकने स्पर्धेत 10 विकेट्सही घेतल्या. हार्दिकच्या अष्टपैलू खेळीमुळे बडोद्याने अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेनंतर लगेच त्याला टीम इंडियामध्ये सामील होण्यासाठी कॉल आला.

Hardik Pandya
माहीच्या 'फिनिशने' लिटल फॅन भावुक, धोनीने दिले अनोखे गिफ्ट

हार्दिकला पहिल्या सामन्यातच कर्णधार धोनीने फटकारले

हार्दिकने जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी -20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच्यासाठी हा सामना अनेक प्रकारे संस्मरणीय होता. त्याला पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून फटकार ऐकायला मिळाली. वास्तविक, हार्दिकच्या पहिल्या षटकात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 19 धावा काढल्या. यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले आणि ख्रिस लिनच्या रुपाने पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. ही विकेट मिळवल्यानंतर तो आनंद साजरा करण्यासाठी लिनकडे पोहोचला होता. यासाठी त्याला कर्णधार धोनीकडून फटकारावे लागले. हार्दिकने एका मुलाखतीत यासंदर्भातील एक किस्सा सांगितला होता. कर्णधाराकडून फटकार मिळाल्यानंतर हार्दिकलाही आपली चूक समजली आणि मग त्याने संपूर्ण सामन्यात असे कोणतेच कृत्य केले नाही. हार्दिकने या सामन्यात 2 बळी घेतले होते.

Hardik Pandya
आंतरराष्ट्रीय महिला दिनी एएसआय ने दिले महिलांना खास गिफ्ट: या पर्यटन ठिकाणी मिळणार मोफत प्रवेश

2016 च्या टी -20 विश्वचषकामध्ये केली कमाल

1 वर्षाच्या आत हार्दिकला 2016 च्या टी -20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. या स्पर्धेत त्याने बांगलादेशविरुद्ध एका सामन्यात रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. वास्तविक बांगलादेशला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. कर्णधार धोनीने मोठा धोका पत्करुन चेंडू हार्दिक पंड्याकडे सोपवला. त्याच्या पहिल्या 3 चेंडूत 9 धावा गेल्या. भारताचा पराभव नक्की दिसत होता. परंतु शेवटच्या 3 चेंडूंमध्ये हार्दिकने अशी काही कमाल केली की, टीम इंडियाला 1 धावांनी विजय मिळवून दिला. यानंतर त्याला एकदिवसीय आणि कसोटी संघातही स्थान मिळाले आणि तो हळूहळू आपल्या खेळासह व्हाईट बॉल संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला.

Hardik Pandya
लगानसाठी अमीरच्या एक्स पत्नीने लिहिलं होत पत्र 20 वर्षांनंतरही अमीर होतो भावुक

हार्दिकच्या वक्तव्याने खळबळ उडाली

हार्दिक कोणत्या ना कोणत्या कारणाने विवादाचा केंद्रबिंदू राहीला आहे. जानेवारी 2019 मध्ये, करण जोहरच्या शॉ 'कॉफी विथ करण'मधील महिलांबाबत त्यांच्या आणि केएल राहुल यांच्या वक्तव्यावरुन बराच मोठा गदारोळ झाला होता. बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यावरुन परत बोलावून सस्पेंड केले होते. मात्र, नंतर दोघांनीही माफी मागितली होती.

हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक लगावले

हार्दिकने भारतासाठी आतापर्यंत 11 कसोटी, 63 एकदिवसीय आणि 49 टी -20 खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1286 धावा, कसोटीत 532 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 शतकासह 11 अर्धशतके देखील केली आहेत. त्याने तीनही फॉरमॅटमध्ये 116 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com