नव्या अ‍ॅडच्या शूटसाठी एमएस धोनीचा खास लुक

चिट्टू भैया या नावाने प्रसिद्ध असलेला सीमंत लोहानी हा धोनीचा बालपणीचा मित्र आहे.
MS Dhoni special look for the new ad shoot
MS Dhoni special look for the new ad shoot Dainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण सोशल नेटवर्किंग साइट्सपासून ते चाहत्यांपर्यंत तो नेहमीच चर्चेत असतो. धोनी अलीकडेच एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये गेला होता. यादरम्यान धोनीने बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीसोबत फोटोसाठी पोज दिली. फोटोमध्ये धोनी मस्त लूकमध्ये दिसत आहे आणि त्याच्यासोबत सीमांत लोहानीही दिसत आहे. चिट्टू भैया या नावाने प्रसिद्ध असलेला सीमंत लोहानी हा धोनीचा बालपणीचा मित्र आहे. आता हा हृदयस्पर्शी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एमएस धोनी शेवटचा IPL 2021 मध्ये मैदानात उतरला होता. यादरम्यान धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला. आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्येही धोनी चेन्नईच्या पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएल लिलावापूर्वी धोनीला चेन्नईने 12 कोटी रुपयांमध्ये राखून ठेवले आहे. 40 वर्षीय धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने भारतासाठी 350 वनडे, 98 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 90 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 17266 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 108 अर्धशतके आणि 16 शतके झळकावली. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन आयसीसी जेतेपदे जिंकण्यात यश आले.

MS Dhoni special look for the new ad shoot
...आता टीम इंडिया उध्दवस्त होईल, दिग्गजाने व्यक्त केली भिती

पंकज त्रिपाठीबद्दल (Pankaj Tripathi) सांगायचे तर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेतल्यानंतर ते 2004 मध्ये मुंबईत आले. त्यावर्षी 'रन' चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. पण, त्यांना चित्रपट विश्वात ठसा उमटवायला तब्बल आठ वर्षे लागली. 2012 मध्ये आलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' या सिनेमाने पंकज त्रिपाठीला प्रसिद्धी मिळवून दिली.

यानंतर मसान, न्यूटन ते मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये त्याचा अभिनय बहरला. पंकज आता या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या 83 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो मान सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. उल्लेखनीय आहे की 1983 च्या विश्वचषकादरम्यान मानसिंग भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com