MS Dhoni: माही घेणार आयपीएलमधून निवृत्ती? या तारखेला करणार मोठी घोषणा

MS Dhoni IPL 2023: भारताचा माजी खेळाडू आणि महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो आणि त्याला प्रसिद्धीझोतात येणेही आवडत नाही.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni IPL 2023: भारताचा माजी खेळाडू आणि महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो आणि त्याला प्रसिद्धीझोतात येणेही आवडत नाही. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, परंतु तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. मात्र, आता धोनीने त्याच्या फेसबुकवरुन एक पोस्ट टाकली आहे, ज्यामुळे अनेक प्रकारची अटकळ बांधली जात आहे.

दरम्यान, भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) त्याच्या फेसबुकवरुन एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये त्याने 25 सप्टेंबर रोजी लाईव्ह येण्याचे म्हटले आहे. धोनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी तुम्हाला एक बातमी सांगणार आहे. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाईव्ह येऊन मी ही माहिती देईन. मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण आतुर असाल. या पोस्टमुळे 41 वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलमधून (IPL) निवृत्तीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.'

MS Dhoni
आपली चूक मान्य करत महेंद्रसिंग धोनी म्हणाला....

यापूर्वी, धोनीने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, तो लाईव्हमध्ये काय घोषणा करणार आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

CSK ला 4 वेळा चॅम्पियन बनवले

महेंद्रसिंग धोनीच्या करिष्माई नेतृत्वाखाली CSK ने चार वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. धोनी मैदानावर खूप शांत राहतो. तो आपल्या हुशारीने विरोधकांवर मात करतो. त्याच्याकडे डीआरएस घेण्याची अप्रतिम कला आहे. परंतु आयपीएल 2022 च्या आधी धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते, त्यानंतर रवींद्र जडेजाने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती, पण त्यानंतर धोनी पुन्हा CSK संघाचा कर्णधार झाला होता. IPL 2022 च्या मोसमात महेंद्रसिंग धोनीने IPL 2023 मध्ये चेन्नईकडून खेळणार असल्याचे सांगितले होते.

MS Dhoni
दशक टी -20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी: आयसीसीने केले जाहीर

जगातील सर्वोत्तम फिनिशर

महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) 2007 मध्ये T20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीने आयपीएलमध्येही आपला ठसा उमटवला होता. त्याने आयपीएलच्या 234 सामन्यांमध्ये 4978 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com