MS Dhoni Post: 'कॅप्टनकूल' दिसणार नव्या भूमिकेत, पण नक्की भानगड काय? धोनीच्या 'त्या' पोस्टने चाहते बुचकाळ्यात

MS Dhoni Post: '...नव्या भूमिकेसाठी उत्सुक', असे म्हणत धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.
MS Dhoni Facebook Post
MS Dhoni Facebook PostDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni hints at new role in cryptic social media post

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण असे असले तरी त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मात्र खेळणे सुरू ठेवले आहे.

दरम्यान, गेल्या दोन हंगांमांपासून त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीचीही चर्चा सुरू आहे. त्यातच सध्या असे अंदाजही बांधले जात आहेत की यंदाच्या 22 मार्चपासून सुरू होणारा आयपीएल 2024 हंगामात धोनी अखेरचे खेळताना दिसू शकतो.

या चर्चा सुरू असतानाच धोनीने सोमवारी (4 मार्च) फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की 'नव्या हंगामाची आणि नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहे. लवकरच घोषणा करेल.'

MS Dhoni Facebook Post
MS Dhoni: अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगला धोनी-ब्रावोच्या दांडियांनी वेधलं लक्ष, Video व्हायरल

धोनीच्या या पोस्टमुळे मात्र चाहते बुचकाळ्यात पाडले आहे. धोनीने ही पोस्ट एखाद्या जाहीरातीसाठी केली आहे की तो चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडणार आहे की आणखी काही कारणामुळे त्याने ही पोस्ट केली आहे, असे अनेक प्रश्न चाहत्यांना आता पडले असून त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

त्यातच काही युजर्सचे असेही म्हणणे आहे की आगामी लोकसभा निवडणूकीच्या आधी धोनीने ही पोस्ट केली असल्याने कदाचीत तो राजकारणातही प्रवेश करू शकतो. दरम्यान त्याच्या पोस्ट मागील खरे कारण काय, हे मात्र अद्याप समजले नाही. पण लवकरच याचा खुलासा होऊ शकतो.

दरम्यान, धोनीच्या या पोस्टवर पहिल्या तासाभरातच दीड हजारांहून कमेंट्स आणि 550 पेक्षा अधिक शेअर्स आले आहेत.

धोनी नुकताच जामनगरमध्ये पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी झाला होता. त्याच्याबरोबर त्याची पत्नी साक्षी देखील उपस्थित होती. धोनी आता लवकरच चेन्नईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

MS Dhoni Facebook Post
MS Dhoni: सारे जहाँ से अच्छा! डौलाने फडकणारा तिरंगा अन् कॅप्टनकूल; पत्नी साक्षीने प्रजासत्ताक दिनी शेअर केला खास Video

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सध्या चेन्नई सुपर किंग्स संघाचे सराव शिबीर लागलेले आहे. त्यासाठी काही खेळाडूही चेन्नईमध्ये पोहोचले असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे.

तथापि, जर धोनीने खरंच या हंगामात चेन्नईचे कर्णधारपद सोडले, तर ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाऊ शकते, असे अंदाज अनेक क्रिकेट तज्ञांनीही व्यक्त केली आहे.

दरम्यान, यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये रविंद्र जडेजाकडे चेन्नईचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, त्याने संघाच्या खराब कामगिरीनंतर अर्ध्यातून कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा धोनीने चेन्नईचे कर्णधारपद स्विकारले. धोनीने चेन्नईने आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व हंगामात नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com