भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये त्याच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून खेळत आहे. लीगमध्ये खेळतानाही धोनी (MS Dhoni) त्याच्या व्यवसायावर पूर्ण लक्ष देत आहे. शेतीसोबतच धोनीने रांची शहरात कुक्कुटपालनही सुरू केले आहे. या व्यवसायासाठी धोनीच्या वतीने 2000 कडकनाथ कोंबडीची ऑर्डर झाबुआ येथील एका फर्मला गेल्या वर्षी देण्यात आली होती. कोरोना आणि बर्ड फ्लूमुळे ही ऑर्डर होल्डवर होती, पण आता या पिल्लांची डिलिव्हरी झाली आहे. (MS Dhoni kadaknath murga)
ऑर्डर धोनीच्या वतीने गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील झाबुआ येथील आदिवासी शेतकरी विनोद मैदा यांची सहकारी संस्था आशिष कडकनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळाला होता. दोन दिवसांनी कडकनाथ कोंबडीची डिलिव्हरी धोनीच्या रिचा फार्ममध्ये केली जाईल. पिकअप गाडीत पिल्ले भरून विनोद रांचीला रवाना झाले आहे, असे विनोद यांनी सांगितले.
विनोदने सांगितले की, तो धोनीसाठी खास गिफ्टही घेत आहे. झाबुआच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून तो धोनीला बाण गिफ्ट करणार आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील काळ्या कडकनाथ कोंबड्यांना 2018 मध्ये छत्तीसगडमधील कायदेशीर लढाईनंतर GI टॅग मिळाला. या प्रकारचा कोंबडा, कोंबडींची अंडी आणि मांस इतर जातींपेक्षा महागड्या दराने विकले जाते.
झाबुआचे जिल्हाधिकारी सोमेश मिश्रा यांनी एजन्सीला सांगितले की धोनीने स्थानिक सहकारी फर्मला 2000 कडकनाथ कोंबडीची ऑर्डर दिली होती जी एका वाहनात रांचीला पाठवण्यात आली होती.'धोनीसारख्या स्टारने कडकनाथ कोंबडीच्या जातीमध्ये स्वारस्य दाखवले ही चांगली बाब आहे. या कोंबड्या कोणीही ऑनलाइन ऑर्डर करू शकतो, ज्याचा फायदा या जातीच्या कोंबड्यांचे पालनपोषण करणाऱ्या आदिवासींना होईल, असे विनोद यांनी सांगितले आहे.
झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख IS तोमर यांनी सांगितले की, धोनीने काही काळापूर्वी ही ऑर्डर दिली होती. मात्र बर्ड फ्लूची साथ पसरल्याने पाठवता आले नाही. झाबुआच्या रुंडीपाडा गावात कडकनाथ जातीची कोंबडी पाळण्यात गुंतलेली सहकारी संस्था चालवणाऱ्या विनोद मैदा यांना धोनीने हा ऑर्डर दिला होता. विनोद मैदा कडकनाथचे चिक आणि बाण आज्ञा चिन्ह घेऊन नक्कीच रांचीला जाणार आहेत, पण ते महेंद्रसिंग धोनीला भेटणार नाहीत. याचे कारण म्हणजे धोनी सध्या मुंबईत असून तो आयपीएल खेळत आहे. अशा परिस्थितीत विनोदला डिलिव्हरी देऊनच परतावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.