Chandrayaan-3: धोनीच्या लेकीचाही भारताच्या यशस्वी चांद्रयान-3 मोहिमेनंतर जोरदार जल्लोष, Video व्हायरल

Ziva Dhoni Celebrated Chandrayaan-3 Successful Landing: एमएस धोनीची 8 वर्षांची मुलगी झिवानेही भारताची चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर जल्लोष केला आहे.
Ziva Dhoni
Ziva DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni’s daughter Ziva Celebrated ISRO Chandrayaan-3 Successful Mission:

भारताने 23 ऑगस्ट रोजी इतिहास रचला आहे. भारतातील इस्त्रोची चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाली आहे. ही मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतभर आनंद साजरा करण्यात आला. भारतवासियांनी विविधप्रकारे आपला आनंद व्यक्त केला आहे.

याचवेळी भारताचा दिग्गज माजी कर्णधार एमएस धोनीची 8 वर्षांची मुलगी झिवानेही भारताची चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर जल्लोष केला आहे.

झिवाचा व्हिडिओ धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग टीव्हीवर पाहाताना दिसतेय. तसेच सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यानंतर ती टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करतानाही दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ziva Dhoni
Chandrayaan 3: साता समुद्रापार डब्लिनमध्ये चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेचं टीम इंडियाकडून सेलिब्रेशन, पाहा Video

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान सॉफ्ट लँडिंग झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिलाच देश बनला आहे. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. या यशाबद्दल इस्त्रोचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

दरम्यान, भारताचा टी20 क्रिकेट संघ आयर्लंड दौऱ्यावर असून त्यांनी डब्लिनमध्ये भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे सेलिब्रेशन केले आहे. भारताला २३ ऑगस्ट रोजी डब्लिनला तिसरा टी२० सामना खेळायचा होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने चांद्रयान-3 च्या लँडिगचे थेट प्रक्षेपण एकत्र पाहिले आहे.

Ziva Dhoni
Chandrayaan 3 Mission : अशी असणार चंद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर 14 दिवसांची मोहिम

तसेच ही मोहिम पूर्ण झाल्यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानेही टाळ्या वाजवत सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओही आणि फोटोही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर 3.84 लाख अंतर कापून 40 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झाले आहे. भारत चंद्रावर पोहचणारा एकूण चौथा देश आहे, तर दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिलाच देश बनला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com