ODI WC 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सध्या रोमांचक सामने खेळले जात आहेत. आत्तापर्यंत तीन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून तीन संघ बादही झाले असले तरी यानंतरही संघ एकमेकांना पराभूत करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.
कारण विश्वचषक 2023 गुणतालिकेतील अव्वल 8 संघ पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील, तर उर्वरित दोन तळातील संघ यातून बाहेर होतील.
दरम्यान, आज जेव्हा इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना सुरु झाला तेव्हा एक मोठा विक्रम होईल, अशी अपेक्षा होती आणि नेमके तेच घडले. एकदिवसीय विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीही घडले नव्हते.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज जेव्हा इंग्लंड आणि नेदरलँड्सचे संघ आमनेसामने आले, तेव्हा इंग्लिश संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. दरम्यान, या विश्वचषकाचा 500 वा षटकार पहिल्या डावातच मारला गेला.
याआधी एकाही विश्वचषकात एकाच स्पर्धेत 500 षटकार मारले गेल्याचे घडले नव्हते. यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत फक्त 40 सामने खेळले गेले आहेत. फायनल संपेपर्यंत 500 चा हा आकडा 600 पर्यंत जाऊ शकतो. अनेक फलंदाज केवळ चौकार-षटकाराचीच भाषा बोलतात. 2015 मध्ये सर्वाधिक षटकार मारले गेले होते.
त्यावर्षी ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळला गेला तेव्हा 463 षटकार मारले गेले होते. त्यावर्षी एकूण 49 सामने खेळले गेले. तर 2019 मध्ये म्हणजे गेल्या विश्वचषकात 48 सामन्यांमध्ये 357 षटकार मारले गेले.
जर 2007 बद्दल बोलायचे झाल्यास, त्या वर्षात 51 सामने झाले होते, ज्यामध्ये सर्व फलंदाजांनी मिळून 373 षटकार मारले होते.
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल पहिल्या क्रमांकावर आहे. सात सामन्यांत त्याच्या बॅटमधून 22 षटकार आले आहेत.
रोहित शर्मानेही 22 षटकार मारले आहेत, मात्र तो आतापर्यंत आठ सामने खेळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत आठ सामन्यांत 20 षटकार ठोकले आहेत. पाकिस्तानच्या फखर जमानने अवघ्या तीन सामन्यात 18 षटकार ठोकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सलामीवीर क्विंटन डी कॉकनेही तेवढेच षटकार ठोकले आहेत. यावेळी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत कोणता खेळाडू बाजी मारतो आणि एकूण षटकारांची संख्या किती पोहोचते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.