Belgium vs Morocco: फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी ग्रुफ एफ मध्ये झालेल्या सामन्यात मोरक्को संघाने बेल्जियम संघाला जोरदार झटका दिला. बेल्जियम संघ फिफा रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मोरक्कोने बेल्जियमला 2-0 गोलफरकाने नमवत एकतर्फी मात केली.
(FIFA World Cup 2022)
दरम्यान, मोरक्कोचा हा विजय धक्कादायक आहे. कारण बेल्जियम हा भक्कम संघ मानला जातो. पुर्णवेळेत मोरक्को संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. भरपाई वेळेत मोरक्कोच्या झकारिया अबुखलाल याने आणखी एक गोल नोंदवून मोरक्कोची आघाडी 2-0 अशी वाढवली. त्यानंतर बेल्जियम संघाला गोलच्या परतफेडीची संधीच नव्हती.
पुर्वार्धात दोन्ही संघांची गोलपाटी कोरीच राहिली. मोरक्कोच्या हाकिम जिएच याने हाफटाईमपुर्वी फ्री किकवर डायरेक्ट गोल नोंदवला मात्र व्हिडिओ असिस्टंट रेफरल (VAR) ने तो फेटाळला. उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांमध्ये चुरशीचा खेळ झाला. मोरक्कोच्या अब्देलहमीद साबिरी याने 73 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. मोरक्कोला मिळालेल्या फ्री किकवर साबिरीने चेंडूला थेट गोलपोस्टची दिशा दाखवली.
दरम्यान, ईडेन हेजार्ज, थोरगन हेजार्ड, केविन डी ब्रुईन अशा खेळाडुंचा भरणा असलेला बेल्जियम संघ मोरक्कोविरोधात एकही गोल करू शकला नाही. यापुर्वी या स्पर्धेत बेल्जियमने कॅनडावर 1-0 गोलफरकाने मात केली होती. तर मोरक्कोचा पहिला सामना क्रोएशियाविरूद्ध अनिर्णित झाला होता. त्यामुळे ग्रुफ एफ मधील समीकरणे बदलली असून आता राऊंड ऑफ 16 मध्ये जाण्यासाठी या गटातही चुरस पाहायला मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.