IPL 2023 Purple Cap: शमीने जिंकली पर्पल कॅप! आजपर्यंत 'या' 14 बॉलर्सनी केलाय असा कारनामा

आयपीएलमध्ये आजपर्यंत कोणत्या 14 गोलंदाजांनी पर्पल कॅप पटकावली आहे, याबद्दल जाणून घ्या.
Mohammad Shami
Mohammad ShamiDainik Gomantak
Published on
Updated on

IPL Purple Cap Winners Players: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने विजय मिळवत विजेतेपदाला घातली. हे संघाचे पाचवे विजेतेपद ठरले आहे.

दरम्यान, या हंगामात अनेक रोमांचक सामने झाले. त्यातही सर्वाधिक धावा करण्यासाठी आणि विकेट्स घेण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये चूरस पाहाला मिळाली. पण अखेर आता सर्वाधिक धावा करणारे आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू मिळाले आहेत.

आयपीएलमध्ये दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप देण्यात येते.

Mohammad Shami
IPL Final CSK vs GT Sai Sudharsan: 21 वर्षीय साई सुदर्शनचा जलवा, अशी कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू

शमीने जिंकली पर्पल कॅप

तसेच यंदा आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीने केला आहे. त्याने 17 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे यंदाची पर्पल कॅप त्याने पटकावली आहे.

आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू -

  • 28 विकेट्स - मोहम्मद शमी (17 सामने)

  • 27 विकेट्स - मोहित शर्मा (14 सामने)

  • 27 विकेट्स - राशीद खान (17 सामने)

  • 22 विकेट्स - पीयुष चावला (14 सामने)

  • 21 विकेट्स - युजवेंद्र चहल (14 सामने)

  • 21 विकेट्स - तुषार देशपांडे (16 सामने)

Mohammad Shami
IPL 2023 Orange Cap: शुभमन गिल ऑरेंज कॅप जिंकणारा 13 वा खेळाडू, पाहा आजपर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

आयपीएलमध्ये 14 खेळाडूंनी जिंकली ऑरंज कॅप

शमी पर्पल कॅप जिंकणारा 14 वा खेळाडू ठरला आहे. याआधी ड्वेन ब्रावो आणि भुवनेश्वर कुमार यांनी 2 वेळा पर्पल कॅप जिंकली आहे. अन्य 12 खेळाडूंनी प्रत्येकी 1 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. विशेष म्हणजे भुवनेश्वर पहिला असा गोलंदाज आहे, ज्याने सलग दोन वर्षी पर्पल कॅप जिंकली होती. त्याने 2016 आणि 2017 या सलग दोन हंगामात पर्पल कॅप पटकावली होती.

आत्तापर्यंत पर्पल कॅप जिंकणारे खेळाडू -

  • 2008 - सोहेल तन्वीर (22 विकेट्स)

  • 2009 - आरपी सिंग (23 विकेट्स)

  • 2010 - प्रज्ञान ओझा (21 विकेट्स)

  • 2011 - लसिथ मलिंगा (28 विकेट्स)

  • 2012 - मॉर्ने मॉर्केल (25 विकेट्स)

  • 2013 - ड्वेन ब्रावो (32 विकेट्स)

  • 2014 - मोहित शर्मा (23 विकेट्स)

  • 2015 - ड्वेन ब्रावो (26 विकेट्स)

  • 2016 - भुवनेश्वर कुमार (23 विकेट्स)

  • 2017 - भुवनेश्वर कुमार (26 विकेट्स)

  • 2018 - अँड्र्यु टाय (24 विकेट्स)

  • 2019 - इम्रान ताहीर (26 विकेट्स)

  • 2020 - कागिसो रबाडा (30 विकेट्स)

  • 2021 - हर्षल पटेल (32 विकेट्स)

  • 2022 - युजवेंद्र चहल (27 विकेट्स)

  • 2023 - मोहम्मद शमी (28 विकेट्स)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com